अाठ दिवसांत जमा झाला १० लाख रु. मदतनिधी !

कवठे यमाई,  ता. २४ एप्रिल २०१६ (सुभाष शेटे) : गेल्या काहि दिवसांपुर्वी आग लागुन जळालेल्या रयत शिक्षन संस्थेच्या कवठे येमाई शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी या ठिकाणी संस्थेच्या सहकार्यातून नवीन व अद्ययावत इमारत उभी करायची या हेतुने या शाळेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते.शाळेच्या उभारणी साठी ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांना विविध स्थरातून चांगल्या प्रकारे मदतीचे  हात पुढे येत असल्याने गेल्या ८ दिवसात सुमारे १० लाख रुपयांचा मदत निधी जमा झाला अाहे.

गावचे कुलदैवत असलेल्या श्री येमाई देवी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या ग्रामस्थांना व माजी विद्यार्थ्यांना  येथील रयत शाळेची जळालेली इमारत नव्याने उभी करण्याचे ग्रामस्थानी सोशल मिडीया,व्हॉट्स अप,भित्तीपत्रके द्वारे केलेया अावाहनास प्रतिसाद देत  शिक्षणाचे महत्व जाणून असलेल्या कवठे येमाई येथील सुजाण ग्रामस्थांनी व अनेक माजी विद्यार्थ्यांनी नवीन इमारत उभी रहावी म्हणून भरीव मदतीचे हात पुढे केले आहेत.

येथील हायस्कुल मध्ये शिकलेल्या १९९९ च्या १० वीच्या  विद्यार्थ्यांकडून ७१ हजार, श्री येमाई देवी यात्रा कामेटी कडून मागिल वर्षीच्या वर्गणीतून एक लाख रुपये, बाफणा बंधूनी ५१ हजार,विविध कार्यकारी सोसायटी कडून ५० हजार रुपये,बबनराव पोकळे व  इचकेवाडी सप्ताह मंडळाने २५ हजार,सुदाम इचके व डॉ सुभाष पोकळे,रामदास सांडभोर  यांनी प्रत्येकी २१ हजार रुपये तर नवज्योत मित्र मंडळ कवठे,भरत भोर,पोपट रोहिले,अशोक सावंत यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये,तर उपसरपंच अरुण मुंजाळ,रयत चे  सेवा निवृत्त प्राचार्य रशीद मोमीन ,फक्कड इचके सर यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत रोख जमा केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या