न्हावरेत नवविवाहितेची अात्महत्या

न्हावरा , ता.२६ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी ) : येथे दोन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली अाहे. रेश्मा विकास पवार (वय २१,रा. न्हावरे) असे अात्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

 पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच २ फेब्रुवारी २०१६ रोजी रेश्मा आणि विकास यांचा विवाह झाला होता.लग्नानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी  पवार हे मागणी करीत होते.१८ एप्रिल रोजी रेश्मा तिच्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी गेली होती.यावेळी सासरा, नवरा, दीर माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून खूप छळतात,असे तिने वडील बाळासाहेब गुंजाळ यांना सांगितले. दरम्यान सासरी पुन्हा तिला नवरा, सासरे, दीर यांच्याकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.अखेर  मानसिक व शारीरिक छळाला कंटाळुन तिने सोमवार (ता.२५) रोजी न्हावरे येथे सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

रेश्माच्या आत्महत्येची वार्ता समजताच तिच्या माहेरहून (बारलोणी, ता. माढा)येथुन अनेक नातलग न्हावरे येथे आले होते.येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पोलिसांनी रेश्माचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.परंतु जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रेश्माच्या नातलगांनी काहि काळ घेतला होता. दरम्यान, रेश्माचा मृतदेह त्यांच्या नातलगाच्या ताब्यात देण्यात अाला.

या  अात्महत्येप्रकरणी रेश्माचा पती विकास काळू पवार, सासरा काळू पवार, दीर प्रकाश काळू पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच नवरा विकास व सासरा काळू पवार यांना पोलीसांनी अटक केली आहे. तर प्रकाश पवार अद्याप फरार आहे.घटनेची माहिती कळताच  पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलीसांना मार्गदर्शन केले.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे, पोलीस हवालदार प्रल्हाद जगताप, विकास कापरे करीत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या