अामदाबादला सामाजिक बांधिलकीने ओढा खोलीकरण

आमदाबाद , ता.२६ एप्रिल २०१६ (सतीश केदारी ) : येथे सामाजिक बांधिलकी जपत सायबेज कंपनीने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे काम हाती घेतल्याची माहीती घोडगंगा कारखान्याचे संचालक रंगनाथ थोरात यांनी दिली अाहे.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच योगेश थोरात, उपसरपंच संदीप जाधव,सायबेज ट्रस्टचे सहकारी प्रशांत महामुनी,अभियंते ऋषीकेश पवार,वंदना थोरात,पाणी पुरवठा अध्यक्ष नितीनअण्णा थोरात, मतीन शेख, धमेंद्रसिंह महिंद्रा, दिनेश दाफ, स्नेहा आनंद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवसेंदिवस पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे पाण्याची पातळी खोलवर जाऊ लागली आहे.दुष्काळ व पाणी टंचाई कमी करण्यासाठी परीसरातील नाला खोलीकरण व रूंदीकरण करणे आवश्यक आहे.याची जाणीव होऊन या परीसरातील कंपन्यांनी नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यातून आमदाबाद येथे नुकतेच नाला खोलीकरण कामाचे भुमीपूजन करण्यात आले.


या संदर्भात कंपनीच्या पदाधिका-यांनी बोलताना सांगितले कि,कंपनीच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातुन अामदाबा गावात ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरन यंत्र बसविणार असुन वृक्ष लागवड तसेच प्राथमिक शाळेच्या विकासासाठी प्राधान्याने कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या