राष्ट्रवादी युवक च्या जिल्हाध्यक्षपदी मानसिंग पाचुंदकर

रांजणगाव गणपती,  ता.२६ एप्रिल २०१६ (संभाजी गोरडे) : शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली अाहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पाचुंदकर यांना निवडीचे पञ देण्यात अाले. यावेळी माजी उपमुख्यमंञी अजित पवार,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,आ. निरंजन डावखरे,माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष रवी काळे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र जासुद, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संतोष रणदिवे,दिलीप मोकाशी,नवनाथ कदम,बाळासाहेब भोर,दत्ताञय पाचुंदकर,अनिल दुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी पाचुंदकर यांनी बोलताना सांगितले कि,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व पक्षाची ध्येय,धोरणे समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या