अाता देणी मिटवायची तरी कशी ?...

पिंपळसुटी,  ता.२८ एप्रिल २०१६ (सतीश केदारी) :  : कष्टाने पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असुन खर्च देखील निघत नसल्याने या साठी उसनवारीने घेतलेली देणी मिटवायची कशी ? हा एकचं सवाल अाता कांदा उत्पादक शेतक-यांना पडला अाहे.

या संदर्भात  पिंपळसुटी येथील एका  शेतक-याने मंगळवारी(ता.२६) रोजी श्रीगोंदा येथे ३१ पिशव्या कांदा विक्रिसाठी पाठविला होता.दोन प्रकारामध्ये प्रतवारी केलेल्या ३१ पिशव्यांना प्रति १०० किलोस अनुक्रमे १७५ व १५० असा बाजारभाव मिळाला.एकुण रक्कम खर्च वजा जाता अवघे २०० रुपयेच फक्त कांद्याची पट्टी हाती मिळाल्याने हताशपणे संबंधित शेतक-याला माघारी फिरावे लागले .अशाचप्रकारे अनेक शेतक-यांवर देखील अशीच वेळ येत असल्याचे चित्र  दिसत अाहे.

चालु हंगामात कांदा उत्पादनासाठी हजारो रुपये खर्च करुन बियाने,लागवड,मशागत प्राथमिक खर्च केल्यानंतर प्रतिकुल परिस्थितीत खते व अौषध फवारनी करुन कांद्याचे पिक तालुक्यातील अनेक शेतक-यांनी घेतले अाहे.प्रामुख्याने बागायती पट्ट्यात उसामध्ये अांतरपिक म्हणुन कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर केलेल्या अाहेत.चांगला बाजारभाव मिळावा यासाठी या परिसरातील शेतकरी पुणे,अहमदनगर,सोलापुर, इतकेच नव्हे तर बेंगलोर, चेन्नई इतक्या दुरवर कांदा विक्रिसाठी पाठवत अाहेत.परंतु कांद्याला अगदी मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने परतीला येण्यासाठी पैसे देखील राहत नाहीत हि वस्तुस्थिती अाहे.

कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावाने शेतक-यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असुन बियाणे,खते,मशागतीचा खर्च मिटवायचा कसा असा  सवाल शेतक-यांसमोर  ' अा ' वासुन उभा राहिला अाहे.
   

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या