डॉ.संतोष दुंडे यांचे राष्ट्रीय परिक्षेत यश

रांजणगाव गणपती,  ता.३० एप्रिल २०१६ (प्रतिनीधी) : भारत सरकारच्या वतीने घेण्यात अालेल्या परिक्षेत येथील रांजणगाव देवस्थानचे उपाध्यक्ष व अस्थिरोगतज्ञ  डॉ. संतोष रामा दुंडेयांनी उज्ज्वल यश संपादन केले अाहे.

या संदर्भात अधिक माहितीदेताना
डॉ. संतोष दुंडेयांनी सांगितले कि,भारत सरकारच्या वतीने फेलो इन इंडस्ट्रियल हेल्थ हि पदव्युत्तर परिक्षा घेतली जाते.या मध्ये देशभरात एकुण फक्त १० परिक्षा केंद्रावर हि परिक्षा घेत ३११ डॉक्टरांनी या मध्ये सहभाग नोंदविला होता.या मध्ये यशस्वी झाल्यानंतर अौद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये व वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत वैद्यकिय सेवा बजावण्याची संधी मिळते .

या यशामध्ये चिंचवड येथील रुग्णालयातील सहका-यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अाहे.

डॉ. संतोष दुंडे यांच्या यशाबद्दल वैद्यकिय क्षेत्रात व परिसरात त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या