सुनिल मोरेला 31 तासानंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश

मांडवगण फराटा ,  ता. १ एप्रिल  २०१६ (सतीश केदारी) :  येथील जुना मळा येथे २० फुट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा  सहा वर्षाचा बालक  अाज दुपारी साडेबारा वाजणेच्या सुमारास अापल्या  मित्रासोबत शेतामध्ये  खेळत असताना अचानक पाय घसरुन शेतात खोदलेल्या  बोअरवेल मध्ये पडल्याची धक्कादायक घटना  घडली.या घटनेला बारा तास उलटुन हि अद्याप रेस्कु पथक,एनडीअार एफ चे जवान, वैदयकिय पथक  मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत अाहे.तर सुनिल देखील चांगला प्रतिसाद देत अाहे

दुपारी साडेबाराच्या सुमारास हि घटना घडली असुन बारा तास उलटुनहि   हा  बालक  जीवन-मरण्याच्या संघर्षाशी लढा देतअाहे.
 
सविस्तर माहिती अशी कि,मांडवगण फराटा येथील जुनामळा येथील शेतकरी  राजाराम शितोळे यांच्या शेतामध्ये शेतमजुर म्हणुन परगावीवरुन पाटोदा-गरड (ता.जामखेड) येथुन पोट भरण्यासाठी  गेले दोन वर्षापासुन शितोळे यांच्याकडे अालेले मोरे कुटुंबीय शेत मजुर म्हणुन शितोळे यांच्या  शेतीत काम करत अाहेत.


अाज सकाळी शनिवारी(ता.३०) रोजी नेहमीप्रमाणे अकरा च्या सुमारास या मुलाची अाजी तुळसाबाई सावळा मोरे या नवनाथ शितोळे यांच्या शेतामध्ये काम करत होत्या.व त्यांच्या पाठोपाठ त्यांचा नातु सुनील हरिदास मोरे हा अाजीच्या मागे अाला होता. दरम्यान शेजारील असणा-या मोकळ्या शेतामध्ये सुनील हा अापल्या मित्रासोबत  दुपारच्या साडेबाराच्या सुमारास खेळत होता. परंतु त्या ठिकाणी नजीकच बोअरवेल ची रात्रीच्या सुमारास  खोदाई करण्यात  अाली होती.हा बोअरवेल चा खड्डा मुलाच्या खेळत असताना लक्षात न अाल्याने सुनील चा पाय घसरुन तो  सुमारे २० फुटाच्या अंतराच्या दरम्यान खोल अरुंद अशा  बोअरवेल च्या खड्ड्यात अडकला गेला. परंतु त्याचवेळी त्याच्या सोबत खेळत असलेल्या मित्राला सुनील हा बोअरवेल च्या  खड्ड्यात पडल्याचे लक्षात अाले.

त्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या अाजीला सांगितला.यावेळी  अाजीनी मोठ्याने  अोरडण्यास  सुरुवात केली. हा घडलेला प्रकार शेतकरी  राजाराम शितोळे यांना सांगितला.त्यानंतर शितोळे यांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधुन तातडीच्या यंत्रणेस कळविले व तसेच हा प्रकार मांडवगण फराटा  ग्रामस्थांना  सांगितला.त्यामुळे ग्रामस्थांनी लागलीच  घटनास्थळी धाव घेतली.या वेळी गावातील ग्रामस्थांनी नजीकच्या वरदविनायक  हॉस्पिटल च्या डॉक्टरांना मदत मागितली व तत्काळ या रुग्णालयातील कर्मचा-यांनी अॉक्सिजन घेउन घटनास्थळी धाव घेउन लगेचच  बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला  तातडीने अॉक्सिजन  पुरविला.



या घटनेची माहिती समजताच शिरुरचे तहसिलदार राजेंद्र पोळ,नायब तहसिलदार गितांजली गरड, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, शिवसेनेचे पोपट शेलार, घोडगंगेचे माजी संचालक दादा पाटील फराटे,माजी सरपंच लतिका वराळे, अात्माराम फराटे, गोविंदतात्या फराटे, बाबापाटील फराटे इनामदार,महादेव फराटे,मदनदादा फराटे,सिमाताई फराटे,नवनाथ शितोळे, राजीव फराटे पाटील,सरपंच सुवर्णा फराटे,उपसरपंच अशोक फराटे, भुषण शितोळे, व तसेच राजकिय व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली अाहे.रात्री उशिरा डिवायएसपी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली.



बालकाला बोअरवेल मधुन बाहेर काढण्यासाठी प्रशासन अद्याप जोरदार प्रयत्न करत अाहे.पोकलेन जेसीबीच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरुच होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या