...अखेर सुनिल मोरे ची मृत्यशी झुंज अपयशी

मांडवगण फराटा ,  ता. २ मे  २०१६ (सतीश केदारी) :  येथील  जुनामळा येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या सुनिल हरिदास मोरे या चिमुरड्याला बाहेर काढण्यास एनडीअारएफ,अग्निशामक दल,वैद्यकिय पथक यांना तब्बल  ३१ तास ३५ मिनिटानंतर सायंकाळी  ७ वाजुन ३५ मिनिटांनी  सुखरुप बाहेर काढण्यात यश अाले.दरम्यान या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढिल उपचारांसाठी पुण्यात  रुग्णालयात  दाखल करण्यात येत असतानाच सुनिल चा मृत्यु झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,शनिवारी(ता.३०)रोजी दुपारी नजीकच्या शेतात खेळत असताना सुनील मोरे हा पाय घसरुन वीस फुट खोल असणा-या बोअरवेल मध्ये पडला होता.हि घटना कळताच त्याला बाहेर  काढण्यासाठी शासकिय यंत्रणा शनिवारी(ता.३०)पासुन घटनास्थळी दाखल झाली होती.परंतु सुनिल हा बालक ज्या ठिकाणी बोअरवेल मध्ये पडला होता.त्या बोअरवेल शेजारी खोदाई काम सुरु  केले असताना त्या ठिकाणी कठिण(पाषाणी)खडक लागल्यामुळे हा कठिण खडकाचा भाग फोडण्यासाठी शनिवारी रात्रीच्या वेळेस ३ मोठे पोकलेन,दोन मोठे जेसीबी,दोन ब्लास्टिंग ट्रॅक्टर, अादी यंत्रसामग्री बोलाविण्यात अाली होती.शनिवारी रात्री या यंत्रणेला तातडीने घटनास्थळी दाखल होण्यास बराच अवधी गेला.हि यंत्रणा पोहोचताच उशिरा खोदाई काम सुरु करण्यात अाले.तसेच हे काम रात्री पोकलेन च्या साहाय्याने पाषाणी खडक फोडण्याचे काम रात्री उशिरा सुरुच होते.व तेच काम रविवारी दुपारर्यंत करण्याावेळी ब्रेकर जास्त खोल जाउ न शकल्याने एनडीअारएफ च्या पथकाने धुरा हाती घेत छोट्या मशिन च्या साहाय्याने खडक फोडण्याचा प्रयत्न सुरु केला.या वेळी त्या चिमुरड्याच्या जिवितास धोका पोहोचु नये म्हणुन विशेष खबरदारी घेण्यात येत  होती.  त्या बोअरवेल च्या शेजारी पोकलेन च्या साहाय्याने सुमारे २३ फुट उभा खड्डा खोदण्यात अाला.व बोअरवेल च्या नजीक छोट्या ब्रेकर च्या साहाय्याने अाडवा सुमारे साडेसहा फुट खड्डा समांतर खोदण्यात अाला.दरम्यान च्या काळात सुनिल मोरे या बालकाच्या छातीसमोर दगड गुंतला असल्याचे बचावपथकाच्या निदर्शनास अाले. या बालकाचे दोन्हि हात अन पाय देखील एकमेकांत गुंतले होते.

 बाहेर काढण्यासाठी हिच मोठी अडचण निर्माण झाली होती. हि अडचण बचावकार्याच्या पथकाने  लक्षात घेत बालकाच्या शेजारील कठिण खडक फोडुन त्याचे गुंतलेले पाय सर्वप्रथम मोकळे केले तरीदेखील त्याचे हात गुंतलेले असल्याने त्याला कसलीच हालचाल करता येत न्हवती. यावेळी डॉक्टरांनी ताबडतोब धाव घेत अात मध्ये जाउन त्याच्या पायाला सलाईनद्वारे अौषधे देण्याचा प्रयत्न केला.त्यावेळेस त्याची प्रकृती खालावत चालली असल्याचे संबंधित डॉक्टरांच्या निदर्शनास अाले.सुनिल मोरे हा बालक बोअरवेल मध्ये पडण्यापुर्वी त्याने जेवणदेखील केले नव्हते.तो केवळ चहाच पिला होता .त्यामुळे त्याच्या पोटात अन्न-पाण्याचा कन देखील नसल्याने त्याला अशक्तपणा अाला होता.दरम्यान अाज दुपारपासुन  त्याने बोलण्याचा प्रतिसाद देखील कमी केला होता.सायंकाळी एनडीअारएफ,अग्निशामक दल, व वैद्यकिय पथकाच्या प्रयत्नांना यश येत कोणतीहि इजा न होता बाहेर काढण्यात यश अाले.


रविवार दुपारपर्यंत सुनिल मोरे हा बोअरवेल मधुन अापला जीव वाचविण्यासाठी बोअरवेल मधुन अापल्या अाई वडील व  अाजी यांना अावाज देत होता.दरम्यान मांडवगण फराटा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर  पुणे येथील रुग्णालयात नेत असतानाच मृत्यु झाला.या बालकाचे ससुन रुग्नालयात शवविच्छेदन करन्यात येणार अाहे.हि वार्ता कळताच मांडवगण फराटा गावासह संपुर्ण शिरुर तालुक्यात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात अाहे.
 
ढिसाळ पोलीस यंत्रणा : गेल्या दोन दिवसांपासुन चिमुरड्याला वाचविण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असताना दुसरीकडे बघ्यांची तोबा  गर्दी झाली होती.गर्दिला पांगविताना पोलीसांनी अनेकांना काठ्यांनी मारहाण केली.तर बोटावर मोजता येईल इतकेच अधिकारी हजारोंच्या गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न करत होते.वस्तुस्थिती पाहता घटनास्थळी शासकिय यंत्रणेचा या कामी अत्यंत हलगर्जीपणा दिसुन येत होता.एकिकडे या बालकाला वाचविण्यासाठी धावा केल्या जात होता.तर दुसरीकडे शासकिय अधिका-यांचा हलगर्जीपणा सुरु होता. या बालकाचा जीव सुखरुप बाहेर येण्यासाठी घटनास्थळी  दुपारपासुन ग्रामस्थांनी भजन  केले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या