"वैभव" च्या उपचारांसाठी 'अॉक्सिकुल' ची मदत

कोंढापुरी,  ता. ३ मे  २०१६ (प्रतिनीधी) : येथील काहि दिवसांपुर्वी अपघातात जखमी होउन पाय निकामी झालेल्या वैभव कारकुड या मुलाच्या उपचारांसाठी "अॉक्सिकुल"कंपनी कडुन पुढील उपचारांसाठी नुकतीच मदत देण्यात अाली.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि,ता.१४ सप्टेंबर २०१५ रोजी वैभव कारकुड या युवकाचा महागणपती दर्शनासाठी येत असताना अपघात झाला होता.या अपघातामध्ये पायाला मोठि जखम झाल्याने त्याचा पाय मांडीपासुन कापावा लागला होता.या संदर्भात माहिती कळताच कोंढापुरी चे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड,अाशिष गायकवाड,अशोक गायकवाड,अजय गायकवाड,नंदाबाइ ढसाळ व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर मदत जमा करुन उपचारांसाठी कारकुड यांना मदत देउ केली होती.तसेच अद्यापर्यंत वैभव वर चार शस्त्रक्रिया करण्यात अाल्या असुन मदतीची अावश्यकता  असल्याचे लक्षात येताच येथील "अॉक्सिकुल"या कंपनी चे मालक नानासाहेब शेळके यांनी नुकताच २५००० रुपयांचा धनादेश वैभव चे वडील अशोक कारकुड यांना दिला अाहे.

या प्रसंगी कोंढापुरी चे मा.सरपंच स्वप्निल गायकवाड,अॉक्सिकुल चे मालक नानासाहेब शेळके,अजय गायवाड,उद्योजक विनय गायकवाड  अादी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या