व्हॉट्सअप ग्रुप कडुन मदतनिधी जमा

रांजणगाव सांडस ,  ता. ३ मे  २०१६ (प्रमोद राजगुरु) :  येथील व्हॉट्सग्रुप "फ्रेंड्स फॉरेवर" च्या युवकांनी एकत्र येत  दुष्काळग्रस्तांना मदत गोळा करुन समाजात वेगळा अादर्श निर्माण केला अाहे.

या संदर्भात "फ्रेंड्स फॉरेवर" या ग्रुपचे सदस्य  सचिन नारायण रणदिवे यांनी माहिती देताना सांगितले कि, दुष्कळाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या काहि दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्या अाहेत.ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशा कुटुंबाना आधार देण्यासाठी आपणही दुष्काळग्रस्तांना मदत थोडीफार मदत करावी असे वाटू लागले.या भावनेतून "फ्रेंड्स फॉरेवर"या व्हॉट्सअप ग्रुप ची स्थापना करण्यात अाली. व या ग्रुपच्या माध्यमातून  8 फेब्रुवारी 2016 रोजी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ग्रुपच्या वतीने   आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला युवकांसह शालेय विद्यार्थ्यांचा देखील प्रतिसाद लाभला.
तसेच रांजणगाव सांडसगावा बरोबर पारगाव,राहु,आलेगाव,नागरगाव,करड़े,निमोने,न्हावरा तसेच इतर शेजारील गावांच्या युवकांनी देखील या कामी मदत केली.अाजतागायत सर्व मिळून ६९ मदतगारांनी मदत देत एकुण मिळून 33,000 रुपये मदतनिधी जमा झाला.

अाज दिनांक ३ मे  रोजी रांजणगाव सांडस येथील पुणे जिल्हा बँकेमार्फत RTGS द्वारे  ही रक्कम " नाम फाउंडेशन " च्या खात्यावर  वर्ग करण्यात आली अाहे. दुष्काळग्रस्तांसाठीचा निधी गावातील युवक व गावातील प्रतिष्ठितांमार्फत जमा करण्यात अाला.

 यावेळी सुदाम रणदिवे,अजित रणदिवे,दादा रणदिवे, राहुल रणदिवे,तुषार जगताप,महेंद्र रणदिवे,ओंकार रणदिवे,निळकंठ रणदिवे, तसेच गावातील  अनेक युवक उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या