शिरुरसाठी कुकडी डाव्या कालव्यातुन पाणी

शिरूर , ता. ४ मे २०१६ (मुकुंद ढोबळे) :  येथील नगरपरिषदेस कुकडी डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी पोहचले असल्याचे व दोन महीने पुरेल एवढा पाणी साठा बंधाऱ्यात सध्या असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे व पाणी पुरवठा सभापती जाकीरखान पठाण यांनी बोलताना सांगितले अाहे.

मंगळवारी(ता.३) रोजी  सकाळी कुकडी डावा कालवा एस्केप ६१ या चारीतुन शिरूर च्या  बंधा-यात  पाणी सोडले असून हे पाणी सोडल्याची प्रत्यक्ष पाहणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा डॉ.विजय थोरात व पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री भगवान दळवी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष केली आहे.तर कुकडी डावा कालवा ६१मधुन पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नन्नोरे व इतर अधिकारी  यांनी मदत केल्याबद्दल सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल व नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक व  नगरसेविका उपस्थित होत्या.

या पाण्याच्या पाठपुराव्यासाठी  आमदार बाबुरावजी पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण,शिरूर चे नगरसेवक विजय दुगड,नारायणगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नन्नोरे,शिरुर चे शाखा अभियंता साळवे साहेब, वाडेगव्हाण चे उपअभियंता  फुंदे अादींचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.

या संदर्भात  बोलताना प्रकाश धारिवाल म्हणाले कि,सध्या दुष्काळ परीस्थिती असून आता शहराला दोन महीने पुरेल एवढा पाणी साठा मिळणार आहे परंतु नागरिकांनी पाण्याचे मोल समजून घेऊन पुढील काळात पाण्याचा वापर काटकसरिने करावा असे अावाहन करत पाणी टंचाई काळात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्द्ल त्यांनी नागरिकांचे आभार मानले .

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या