पोलीसांनी बोअरवेल मालकावर केला गुन्हा दाखल

शिरूर ,   ता.५ मे २०१६ (प्रतिनीधी ) :  मांडवगण फराटा येथील  जुनामळा येथील दुर्घटनेत बोअरवेलमध्ये पडून सुनिल मोरे याचा दुर्देवी मृत्यु झालाअसुन,याप्रकरणी बोअरवेल चे मालक नवनाथ काशिनाथ शितोळे यांच्यावर निष्काळजीपणा व सुनिल मोरे च्या म्रुत्यूस कारणीभूत ठरला असल्याचा गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मांडवगण फराटा येथील जुना मळा येथे शनिवारी(ता.३०)रोजी दुपारच्या सुमारास  नजीकच्या शेतात खेळत असताना सुनील मोरे हा पाय घसरुन वीस फुट खोल असणा-या बोअरवेल मध्ये पडल्याची दुर्देवी घटना घडली होती.


या वेळी शर्थीचे प्रयत्न करत एनडीअारएफ,अग्निशामक दल,वैद्यकिय पथक यांनी तब्बल ३१ तास ३५ मिनिटानंतर सायंकाळी  ७ वाजुन ३५ मिनिटांनी सुनील ला सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवले होते. दरम्यान या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढिल उपचारांसाठी पुण्यात  रुग्णालयात  दाखल करण्यात येत असतानाच सुनिल चा मृत्यु झाला होता.

या दुर्देवी घटनेनंतर शिरूर पोलिसांनी या जागेचा पंचनामा करून यामधे बोअरवेल चे मालक नवनाथ शितोळे यांनी आपल्या शेतात बोअरवेल घेतला परंतु त्याच्या वर कुठले झाकण ठेवले नसून, बोअरवेल बाबत निष्काळजीपणा केला व सुनिल मोरे यांच्या म्रुत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या