पारोडी चे सरपंच अपात्र

पारोडी ,   ता.६ मे २०१६ (प्रतिनीधी ) : येथील सरपंच विकास काशिनाथ शिवले यांना अतिक्रमणाच्या तक्रारीवरून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी अपात्र ठरविले अाहे.तर शिवले यांनी देखील या निर्णयाविरोधात अपिल दाखल केले अाहे.


शिवतक्रार म्हाळुंगी येथील  वनविभागातील गायरान जमिनीत वीटभट्टी,पत्राशेड व खोल्या यासाठी १० गुंठे क्षेत्राचा वापर त्यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर  ठेवण्यात आला अाहे.याबाबत शिक्रापूरच्या वन अधिकाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला होता. त्या आधारे सरपंच शिवले यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असुन विकास शिवले यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

दरम्यान सरपंच शिवले यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात अतिरिक्त आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. पुढील सुनावणीपर्यंत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.तसेच याबाबत शिवाजी सोनबा शिवले यांनी तक्रार केली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या