'अार्ची,' 'परश्या' अन 'सैराट' नी तरुणाईला याड लागलं !

शिरूर ,  ता.७ मे २०१( सतीश केदारी) : नुकताच प्रदर्शित झालेल्या "सैराट" या चित्रपटाने सोशल मिडियासह सर्वत्र भलतंच 'याड लागलं" असुन तरुणाई मात्र  या  सिनेमा ने चांगलीच "झिंगाट" झालेली दिसत अाहे

गेल्या अाठवड्यात नागराज पोपटराव मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या "सैराट" हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटाविषयी समाजात अनेक चर्चा झडु लागल्या होत्या.या मध्ये मागासलेल्या समाजातील युवकाचं उच्चभ्रु घराण्यातील मुलीशी असलेले प्रेम दाखविण्यात अाले अाहे.अनेकांनी चित्रपटाविषयी टिका केली तर अनेकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले.प्रदर्शनानंतर मात्र अनेकांनी वाहवा केली अाहे.नागराज मंजुळे यांनी अल्पवयात प्रेमात पडलेल्या परश्या अन् अार्ची चं फुलत गेलेले प्रेम, प्रेमाला घरच्यांचा झालेला विरोध,घर सोडुन गेल्यानंतर प्रेमी युगुलांची होणारी फरफट यांचं सुंदर चित्र समाजासमोर मांडलं अाहे.

ग्रामीण भागात संपुर्ण शुटिंग केलेल्या या चित्रपटातील नायिकेची  "बुलेट" गाडीवर होणारी एंट्री,विहिरीत बिंधास्त मारलेली उडी,वेळप्रसंगी परश्या साठी दुस-यावर बंदुक रोखणा-या व बिंधास्त प्रेम व्यक्त करणा-या "अार्ची" ने तरुणाइला अक्षरश: वेडे करुन सोडलेले अाहे. यामुळेच कि काय  सध्या बहुतेक तरुन-तरुणींच्या व्हॉट्सअप ग्रुप वर व व्हॉट्सअप च्या डिपी (प्रोफाइल) वर अार्ची अन परश्या चे फोटो ठेवलेले दिसत अाहेत. तसेच जवळजवळ सर्वच व्हॉट्सग्रुप वर या चित्रपटातील संवाद व जोक शेअर होत असुन फेसबुक वर देखील चांगलाच बोलबाला असल्याचे जाणवते.तर या चित्रपटात अभिनय केलेल्या  रिंकु राजगुरु चे नुकतीच नववीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवलेल्या मार्कशीट सह व अाई च्या सोबत असलेले फोटो देखील चांगलेच व्हायरल झालेत.

दुसरीकडे हा चित्रपट का  पाहावा या विषयी केलेले समीक्षण असलेली पोस्ट देखील अनेकांकडुन शेअर होतेय. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली याड लागलं,सैराट झालं जी अन झिंगझझिंगाट यां गाण्यांची तरुणाईत मोठी क्रेझ असुन गाण्यांसह रिंगटोन ची मागणी होते अाहे.

नागराज मंजुळे यांच्या फॅंड्री चित्रपटानंतर अालेल्या सैराटसह मंजुळेंचे देखील  कौतुकाच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरताना दिसत अाहेत.

एकंदरीत संबंध तरुणाई च्या मनांवर  बिंधास्त धाडसी असणारी अार्ची,सरळमार्गी असणारा परश्या यांनी रसिकांच्या ह्रदयावर  चांगलेच गारुड केलेले असुन सर्वच युवकवर्ग "सैराट" ने सोशल मिडियावर चांगलाच झिंगलेला दिसत अाहे. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या