कामगार पत्नींचा शिक्रापूर पोलीस ठाण्यात ठिय्या

सणसवाडी, ता.९ मे २०१६ (प्रतिनीधी) : सणसवाडी आणि पिंपळे जगताप येथील दोन युनिटमध्ये असलेल्या इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज लि. कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी कामगारांच्या पत्नींनी  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंपनी व्यवस्थापकास अटक करा, या मागणीसाठी ठिय्या मांडला होता.

सणसवाडी येथे कामगार दिनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज चे सुमारे ४०० कामगार सात दिवसांपासुन उपोषणास बसले आहेत. परंतु यासंदर्भात  पर्याय न निघाल्याने व २३ कामगारांना रुग्णालयात दाखल केल्याने कामगारांच्या पत्नींनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.या वेळी कंपनी व्यवस्थापकास आमच्या समोर हजर करा, अशी मागणी करत महिलांनी  पोलीस ठाण्यातच तब्बल चार तास ठिय्या मांडत अाक्रमक पावित्रा घेतला व उपस्थित महिलांनी कंपनी प्रशासना विरोधात घोषणा दिल्या.

या वेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी कंपनी व्यवस्थापकाशी फोनवर चर्चा करून कामगारांच्या प्रश्नांबाबत उद्या बैठक घेण्याचे उपस्थित महिलांना सांगितले. व याबाबत उद्या सकाळी दहाच्या सुमारास तातडीची बैठक घेऊन कामगारांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना व्यवस्थापकास केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कंपनी व्यवस्थापकामुळे आमच्या पतींना उपोषणास बसण्याची अामच्यावर  वेळ आली असल्या मुळे चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा व अटक करा, अशी मागणी महिलांनी केली होती.

पोलीस ठाण्यात जमलेल्या संतप्त महिला यावेळी  काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या