सणसवाडीतील कामगारांचे उपोषण मागे

सणसवाडी,  ता.१०मे २०१६ (प्रतिनीधी) :  गेल्या नऊ दिवसांपासुन  सणसवाडी व पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील इनोव्हेंटिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यातील कामगार  व्यवस्थापनाने केलेल्या अन्यायामुळे प्राणांतिक उपोषणास बसले होते. अखेर कामगार उपायुक्तांनी कारखाना व्यवस्थापनाला ३७२ कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिल्याने कामगारांनी उपोषण मागे घेतले अाहे.

काल (सोमवारी) सायंकाळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, पंचायत समिती सदस्या दीपाली शेळके, महिला अत्याचार मुक्ती मंचच्या प्रीती चव्हाण,यांच्या उपस्थितीत कामगारांना सरबत देऊन उपोषनाच्या नवव्या दिवशी कामगारांनी उपोषण सोडले.

यासंदर्भात या कंपनीतील  कामगारांनी प्रशासनाकडे वेतनवाढीसंदर्भात मागणीपत्र सादर केले होते.कारखाना व्यवस्थापनाने  हि वेतनवाढ दिली तर नाहि याउलट ३७२ कामगारांना कामावर येण्यास मनाई केली होती.दरम्यान दोन महिन्यांचे वेतनही दिले नाही व १०० कामगारांना खोट्या तक्रारीवरून निलंबित देखील केले.अशा प्रकारे कामगारांवर अन्याय  होत असल्यामुळे कामगारदिनीच ३७२ कामगार आपल्या मागण्यांसाठी प्राणांतिक उपोषणास बसले होते.रविवारी कामगार पत्नींनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. अखेर  आंदोलनाच्या नवव्या दिवशी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये सहायक कामगार आयुक्त बी. पी.आंधळे,पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ,राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, कारखाना व्यवस्थापन संचालक रवींद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्या दीपाली शेळके, सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब दरेकर,आदींच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत देखील योग्य तोडगा निघु शकला नाही.

सायंकाळी पुण्यातील बैठकीत कामगार उपायुक्त आंधळे यांनी ३७२ कायम कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश दिले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या