अजित गावडे चा जामीनअर्ज पुन्हा फेटाळला

शिरूर,   ता.१३ मे २०१६ (प्रतिनीधी) :   माजी अामदार पोपटराव गावडे यांचा नातु अजित गावडे याचा पुणे न्यायालयाने अटी व शर्ती च्या उल्लंघण केल्याप्रकरणी  जामीनअर्ज पुन्हा  फेटाळण्यात अाला अाहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि, अजित याने शिरुर तालुक्यातच  राहणा-या व पुणे येथेच वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या तरुणीवर केलेल्या अतिप्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वेळावेळी अत्याचार केला होता. याप्रकरणी  अजित गावडे आणि इतर तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणीने झोपेच्या गोळया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरूणीच्या नातेवाइकांनी तिला वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. दरम्यान, तरूणीने झोपेच्या गोळया खाण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
 
यानंतर अजित गावडे याच्याविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ११ मार्च रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तरूणीच्या कुटूंबियांना  अारोपीच्या कुटुंबीयांकडून धमक्या येण्यास सुरवात झाली होती. त्याबाबत तरूणीच्या कुटूंबियांनी टाकळी हाजी येथील पोलिस चौकीत त्याबाबत तक्रार दिली. या होणा-या त्रासाला कंटाळून तरूणीने झोपेच्या गोळया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणात अारोपी अजित गावडे याने  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.यानंतर अजित गावडे याला पुणे न्यायालयात अटी व शर्ती नुसार अंतरीम जामीन मंजुर करण्यात अाला होता.परंतु घालुन दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न केल्याने अजित च्या विरोधात पुन्हा अपिल करण्यात अाले होते. अखेर अजित चा जामीन रद्द करण्यात अाला अाहे.

या संदर्भात  पिडितेच्या कुटुंबीयांनी उशिरा का होइना न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या