कवठेत पुन्हा उभी राहतेय शाळा...

कवठे यमाई,  ता. १५ मे २०१६( सुभाष शेटे) :   येथील न्यू इंग्लिश स्कूलची जुनी इमारत सुमारे दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळाली होती.या ठिकाणी नवीन व अद्ययावत इमारत उभी करायच्या संकल्पेने ग्रामस्थ व संस्थेने दोनच महिन्यात निधी जमाकरुन  नवीन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते केले अाले.

या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,रयत शिक्षन संस्थेचे पश्चिंम विभाग अध्यक्ष माजी आमदार राम कांडगे,माजी आमदार सुर्यकांत पलांडे,माजी आमदार पोपटराव गावडे,देवदत्त निकम,बाळासाहेब बेंडे,रयत संस्थेचे विभागीय अधिकारी  चंद्रकांत जाधव ,प्राचार्य किसनराव रत्नपारखी,सीमाताई जगताप,मनीषा लंघे,गुलाबराव धुमाळ अादी  मान्यवर उपस्थित होते.

या नवीन इमारतीच्या उभारणी कामी  गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी सुमारे २० लाख रुपये जमा केले असून संस्थेचे मेनेजिंग कौन्सिल चे माजी सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी हे  मांजरी बुद्रुक ता.हवेली  परिसरातील त्यांच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातुन पाच लाख रुपये मदत या कामी  देणार असून त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला आहे .या वेळी उपस्थित मान्यवरांनी रत्नपारखी सर व त्यांच्या माजी विद्यार्थी संघटनेचे मनापासून अभिनदन व कौतुक केले.

कार्यक्रामाचे सूत्र संचालन रामदास रोहिले यांनी केले तर आभार संजय चौधरी यांनी मानले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या