विवाहाचा खर्च टाळुन "जलयुक्त शिवार " ला मदत

शिक्रापूर,   ता.१६ मे २०१६(प्रतिनीधी) :  येथील दरवडे कुटुंबाने दुष्काळी पार्श्वभुमीवर लग्नच नोंदणी पद्धतीने करत लग्नाचे वाचललेले पैसे जलयुक्त शिवार योजनेसाठी देत समाजापुढे नवा अादर्श निर्माण केला अाहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि, उच्चशिक्षित असलेले डॉ.प्रितम दरवडे यांचा विवाह भोर तालुक्यातील वेनवडी येथील डॉ.श्वेता नेवसे यांच्याशी ठरला होता.या दोन्ही उच्चशिक्षित कुटुंबाने विवाह अगदी साध्या पद्धतीने करायचा ठरवला होता.त्यानुसार विवाह अाळंदी (ता.खेड) येथे नोंदणी पद्धतीने करत यातुन वाचलेले सुमारे ५२ हजार रुपये चा धनादेश  जलयुक्त शिवार योजनेसाठी चंद्रशेखर दरवडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे नुकतेच पुण्यात देऊ केला अाहे.

सध्याच्या लग्नसराईत विवाहसमारंभात होणारा वारेमाप खर्च पाहता दरवडे कुटुंबाने  समाजापुढे नवा अादर्श घालुन दिला अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या