तरुणांचा "सैराट" उपक्रम; ३३३ झाडांचे केले वृक्षारोपन

रांजणगाव सांडस ,   ता.  १७ मे २०१६ (सतीश केदारी) : येथील युवकांनी एकत्र येत अाज ३३३ झाडांचे वृक्षारोपन करत युवकांसमोर  नवा अादर्श निर्माण केला अाहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि, येथील सोशल मिडियावर व्हॉट्सअप वर व इतर  वेगवेगळे सुमारे १४ ग्रुप अाहेत.येथील युवकांनी एकत्र येत झाडे लावा-झाडे जगवा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले होते.त्यानुसार अनेकांनी थेट पुढाकार घेत अनेकांना वृक्षांसाठी थेट अावाहन केले होते.त्यांच्या या अावाहनाला प्रतिसाद देत राजेंद्र शिंदे यांच बरोबर माउली रणदिवे व गावातील इतर तरुणांनी मोठ्या प्रमाणावर झाडे दान केली.

या साठी गावातीलच युवकांनी खड्डे खोदण्यासाठी तातडीने जेसीबी उपलब्ध केल्याने जास्तीतजास्त खड्डे कमी वेळेत खोदता  अाली.

प्राथमिक तयारी पुर्ण होताच अाज युवकांनी मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपन केले.यावेळी इथेच न थांबता या झाडांचे संगोपन देखील करणार असल्याची प्रतिज्ञा अनेकांनी केली अाहे.या वेळी अालेल्या मान्यवरांनी युवकांचे मोठे कौतुक केले व शुभेच्छा देखील दिल्या.

या प्रसंगी संतोष रणदिवे,दिपक कोकडे,एकनाथ शेलार,संजय काळभोर,अरुण भोसले,संभाजी लोखंडे,महेंद्र बिडगर, पांडुरंग लोखंडे,महेंद्र रणदिवे,अजित इटनर,त्याच बरोबर सुदर्शन चौधरी,संभाजी लोखंडे,तुषार जगताप अादी मान्यवर उपस्थित होते.

सोशल मिडिया वर सध्या झाडे लावा,पाणी बचत करा असे मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात अाहेत.परंतु युवकांनी एकत्र येत "सैराट" कृतीतुन कार्याचा ठसा दाखविल्याने  समाजा पुढे वेगळा अादर्श निर्मान केला अाहे.या पुर्वी देखील येथील युवकांनी  दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी जमा करुन सामाजिकतेचे दर्शन घडविले होते.

 

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या