कारेगाव ग्रामपंचायत चे काम कौतुकास्पद- वळसे पाटील

कारेगाव ,  ता.१९ मे २०१६ (प्रतिनीधीे) : नैसर्गिक ऊर्जा स्ञोताःचा वापर केल्यास वीज बील कमी येईलच शिवाय पर्यावरणाचे संवर्धन होईल.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत राबवत असलेले वेगवेगळे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे  मत .आमदार दिलीपराव वळसेपाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कारेगाव येथील दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या सोलर मोटरीचे उद्घाटन आमदार दिलीपराव वळसेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यामुळे पुढील काळात ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात विजबिल बचत होणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार ,जि.प.सदस्य राहुल पाचर्णे,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,देवदत्त निकम,सरपंच अनिल नवले ,उपसरपंच नवनाथ नवले , सुनिल ओस्तवाल ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होत.

शिरुर  तालुक्यात सोलर मोटर चा वापर करणारी कारेगाव ग्रामपंचायत हि एकमेव ग्रामपंचायत असल्याने उपस्थितांनी सांगत ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले.

या  वेळी सरपंच  अनिल  नवले यांनी सर्वांचे अाभार  मानले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या