चिंचणी धरणाची सुरक्षितता धोक्यात ?

चिंचणी,  ता.२० मे २०१६ (तेजस फडके)   येथील घोडधरणाचा जुन्या मातीचा भराव जेसीबीच्या सहाय्याने खोदुन श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी बेकायदेशीरीत्या जलवाहीनी टाकल्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.परंतु घोडचे वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

चिंचणी येथील घोडधरण हे जुने मातीचे धरण असुन धरणाच्या पुर्व-दक्षिण बाजुला असणारा भराव हा पुर्णपणे दगड व मातीचा भराव आहे.या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे श्रीगोंदा व शिरुर तालुक्याची  हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली आलेली आहे.धरणाच्या पुर्व बाजुला असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या धरणाचा मुख्य मातीचा भरावच उकरून चर खोदुन जलवाहिन्या टाकल्या अाहेत. त्यामुळे गेले अनेक वर्षाच्या मुख्य भरावाच्या पिचिंगला धोका निर्माण झाला असुन धरण १०० % भरल्यास या भरावाला धोका निर्माण होऊ शकतो.तसेच धरणाच्या डाव्या कालव्याच्या वरुनही बेकायदेशीर चर खोदुन पाईपलाईन केल्या आहेत.

चिंचणी धरण परिसरात अनेक बेकायदेशीर मोटारी व पाईपलाईनचे जाळे झाले असुन धरणाच्या मुख्य भरावातुन शासनाच्या कोणत्याही परवानगी शिवाय शेतकरी पाईपलाईन नेत असताना व धरणात मृत पाणीसाठा असताना घोडचे वरिष्ठ अधिकारी याकडे मात्र कानाडोळा का करत आहेत ? असा यक्षप्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला असुन यात नक्कीच राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणीच असे धाडस करु शकणार नाही. अशी चर्चा चिंचणी व परिसरात चालु आहे.तसेच घोडचा एक वरिष्ठ अधिकारी श्रीगोंदा तालुक्यातील असल्यामुळे या सर्व प्रकरणात तो सामील असुन त्यांनीही खुप मोठी आर्थिक तडजोड केली असल्याचे काही ग्रामस्थांनी नाव न छापन्याच्या अटीवर सांगितले.

याबाबत शिरुर येथील घोडच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता नाव न छापन्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की," सध्या आमच्याकडे मनुष्यबळ फार कमी झाले असुन गेले अनेक दिवस आमचे पगारही रखडलेले आहेत.त्यामुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत.तसेच खात्यातुन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर शासनाने पुन्हा नवीन कर्मचारी भरलेले नाहीत.त्याचप्रमाणे धरण परिसरातील अनेक दादालोक व शेतकऱ्यांना अनेक वेळा तोंडी समज दिली असुनही त्यांनी काम बंद केले नाही. आमच्याच खात्याचे वरिष्ठ अधिकारीच याबाबत उदासीनता दाखवत असल्याने आमचा नाईलाज आहे.असेही त्यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या