माती उपसा जोमात;महसुल कोमात

शिरूर,  ता.२१ मे २०१६ (तेजस फडके) :  घोडधरणाच्या कडेला असणाऱ्या गोलेगाव , दाणेवाडी , पिंपळाचीवाडी,काळेवस्ती,शिंदोडी या ठिकाणच्या  नदीपात्रातुन स्थानिक मातीसम्राट मोठया प्रमाणात मातीउपसा करत असुन हि माती शेतीला कमी आणि वीटभट्टीसाठी जास्त प्रमाणात  विकली जात आहे.दररोज शासनाचा लाखो  रूपयाचा महसुल बुडत असताना महसूल खाते मात्र याकडे कानाडोळा करत असल्याने मातीसम्राटांनाही मोकळे रान मिळाले आहे.

शिरुर-हवेलीचे माजी आमदार अँड अशोक पवार यांनी आमदार असताना २१ नोव्हेंबर २०११ रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चिंचणी (ता.शिरुर) येथील घोड धरणातील गाळ  उचलुन स्वतःच्या शेतात टाकण्यासाठी कसलीही रॉयल्टि आकाराली जाऊ नये अशी लक्षवेधी सुचना मांडली होती.त्यावेळी शासनाने त्याला मान्यता दिली होती. तेव्हापासुन आजपर्यंत शेतीच्या नावाखाली मातीसम्राटांनी घोडनदीतुन हजारो ब्रास माती बेकायदेशीररित्या वीटभट्टीला विकलेली आहे.महसुल खात्याच्या काही कर्मच्याऱ्यांना हाताशी धरुन हे सगळे उद्योग बिनबोभाट सुरु असल्यामुळे महसुल कर्मच्याऱ्यांनाही " अच्छे दिन " आले आहेत.

महसुल खात्याकडुन काही ब्रास मातीची रितसर परवानगी काढायची आणि त्याच्या दहापट बेकायदेशीर माती भट्टीला विकायची असा बिनभांडवली व्यवसायच काही तरुणांनी चालु केला असुन त्यातुनच आत्तापर्यंत लाखो रुपये कमावले आहेत.त्यामुळे सध्या माती उपसा करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु झाली असुन त्यातुनच एकमेकांची डोकी फोडन्यापर्यंत प्रकरने  वाढली आहेत.त्यामुळे या मुजोरपणाला कुठेतरी चाप बसने जरुरीचे आहे.अन्यथा हया भांडणामुळे  भविष्यात खुप मोठा धोका निर्माण होणार आहे.

शिरुर तालुक्यात सध्या वाळूमाफिया आणि लँडमाफिया नंतर मातीमाफिया तयार होत असुन प्रशासनाने याकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या