...त्या शेतक-याची कांदा पट्टी सोशल मिडियावर व्हायरल

वडगाव रासाई,   ता.२३ मे २०१६ ( सतीश केदारी) : येथील शेतकरी व माजी उपसरपंच देविदास परभाणे यांनी पुणे मार्केट ला पाठविलेल्या कांद्याची पट्टी अवघी रुपया अाल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन हि पोस्ट सोशल मिडिया वर चांगलीच व्हायरल झाली अाहे.

सविस्तर  माहिती अशी कि,या गावातील शेतकरी देविदास  मारूती परमाने यांनी (ता.१०) मे रोजी पुणे येथील मार्केट यार्डातील पल्लवी ट्रेडींग कंपनी या आडतदाराकडे विक्रीसाठी एकूण १८ पिशव्या कांदा पाठविला होता.त्याचे वजन ९५२ किलो इतके भरले. या कांद्यास  प्रति १० किलोस १६ रुपये म्हणजेच कांद्याच्या प्रतिकिलोस १ रूपया ६० पैसे इतका दर मिळाला.तर या मालाची एकूण रक्कम १५२३ रूपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३१ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रूपये ५५ पैसे,तोलाई ३३ रूपये ३० पैसे तर मोटार भाडे १३२० रूपये एवढा खर्च पट्टीतून वजा करून शेतकर्‍याच्या हाती अवघा १ रूपया उरला.

या पुर्वी पिंपळसुटी येथील शेतक-याला देखील असाच अनुभव अाला होता.शिरुर तालुक्यात बागायती भागात देखील कांदा उत्पादन मोठ्या प्रमानावर  झाले असुन चेन्नइ,कोल्हापुर अशा भागात  १ रुपया तरी वाढवुन मिळेल या अाशेने शेतकरी कांदा विक्रीसाठी पाठवत असुन कवडीमोल बाजार असल्याने परतीचेच पैसे अाडत्याला द्यावे लागत असल्याचे चित्र अाहे.

एवढे कष्ट करुन घेतलेल्या कांदा उत्पादनाची पट्टीच १ रुपया मिळाल्याने सध्या गेल्या काहि दिवसांपासुन हि कांदा  पट्टी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असुन अनेकांच्या डोळ्यात पाणी अाणत अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या