चला साथ देउया..उज्जवल भवितव्य घडवुया !

शिरूर,  ता.२३ मे २०१६ (तेजस फडके/सतीश केदारी ) : पत्रकारितेबरोबरच  सामाजिक बांधिलकी जपत लाखो मनांमध्ये अधिराज्य गाजवत असलेल्या संकेतस्थळ www.shirurtaluka.comच्या व विचार मंचच्या वतीने गरीब, गरजु, होतकरु विद्यार्थ्यांना अार्थिक मदत करण्यात येणार असून गरजूंनी तसेच तालुक्यातील महाविद्यालय,शाळांनी संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात येत अाहे.

गेल्या पाच वर्षांपासुन अविरत सुरु असलेल्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने विविध माध्यमांतुन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली अाहे.या पुर्वी संकेतस्थळ व संकेतस्थळाच्या व्हॉट्सअप ग्रुप व विचारमंच च्या वतीने व दानशुर व्यक्तींच्या सहकार्याने अाजपर्यंत अनेकांना मोठी मदत होउ शकली अाहे.

सामाजिक उद्देश ठेवत गरीब व गरजु विद्यार्थ्यांची होणारी परवड लक्षात घेत समाजातील दानशुर व्यक्तींच्या सहकार्याने मदत करण्यात येणार असुन संकेतस्थळाच्या वतीने महाविद्यालय, शाळा, विद्यार्थी यांनी  संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात येत अाहे.

चला साथ देउया... विद्यार्थ्यांचे  उज्जवल भवितव्य घडवुया !


संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक:  तेजस फडके  : ९७६६११७७५५
                                             सतीश केदारी :८८०५०४५४९५

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या