गांजेवाडीत बिबट्या झाला जेरबंद

कवठे यमाई,  ता. २७ मे २०१६( सुभाष शेटे) : कवठे येमाई नजीकच्या गांजेवाडीत आज (ता.२७) रोजी पहाटे एक नर जातीचा सुमारे पाच वर्षे वयाचा बिबट्या वन विभागाने  लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन यापरिसरातील अनेक पाळीव जनावरे,कुत्र्यांचा या बिबट्याने फडशा पाडला होता.तर (ता.२३)रोजी  येथील पांडुरंग शिंदे या मेंढपाळाच्या दोन बकरांवर हल्ला करीत त्यांना ठार केले होते. या बाबत शिरूर वन विभागाने गांजेवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी  पिंजरा लावला होता.गेल्या ४ दिवसांपासुन पिंजरा लावुनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने व ग्रामस्थांना त्याचे सातत्याने  दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण  झाले होते .

आज शुक्रवार (ता.२७) ला पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधात असणारा हा सुमारे पाच वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पिंज-याच्या बाजूने लावलेल्या छोट्या पिंजा-यात असलेल्या भक्षावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात तो अडकण्यासाठी लावलेल्या मोठ्या पिंज-यात अलगद अडकला.सकाळी सातच्या दरम्यान वन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी त्यास तातडीने जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राकडे हलविले. या वेळी बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .शिरूरचे वनाधिकारी शेंडगे,वनपाल दशरथ सपकाळ,क्षिरसागर ,फापाळे,फरगडे,उकिर्डे,भुजबळ व अनेक वन कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

दरम्यान एक मादी बिबट्या व काही बछडे यांचा अद्द्यापही या परिसरात वावर असल्याने या ठिकाणी पिंजरा पुन्हा लावण्याची गरज  ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या