चिमुकल्यांच्या मदतीला सरसावले हजारो हात...

टाकळी हाजी,   ता. ३ जुन २०१६ (सतीश भाकरे)  : माळवाडी येथील  आकस्मिक निधन  झालेल्या पित्याच्या निधनामुळे पितृछञ हरपलेल्या तीन लहान बालकांना ग्रामस्थांनी मदतीचे आव्हान करताच हजारो मदतीचे हात लहानशा चिमकुल्यांच्या मदतीसाठी सरसावले.या वेळी अद्याप हि समाजात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय अनुभवयास मिळाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की माळवाडी (टाकळी हाजी)येथील विवाहित तरुण पंढरीनाथ हनुमंत भाकरे (वय३४)याचे दहा दिवसापुर्वी आकस्मिक निधन झाले होते.भाकरे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच.त्याच्या पाठीमागे पत्नी,दोन मुली,एक मुलगा आणि वृध्द आई वडिल असा परिवार आहे.कुटुंबातील प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी पंढरीनाथवर होती.पंढरीनाथचे दहा दिवसापुर्वी आकस्मिक निधन झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले होते.
परंतु अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे गरजेचे  असल्याने माळवाडीतील प्रमुख मंडळीनी पुढाकार घेत अाज ग्रामस्थांना व नातेवाईकांना त्याच्या लहान मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी अडचण येवु नये म्हणून मदतीचे आव्हान केले.त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत जमलेल्या ग्रामस्थांनी,नातेवाईकांनी,मिञ परिवारांनी स्वखुशीने १००रुपयापासुन ते ११००० रूपयापर्यंत पैसे दिले.या वेळी दशक्रिया विधीच्या घाटातच तब्बल दोन लाख पस्तीस हजार रुपये जमा झाले.जमा झालेली सर्व रक्कम  पंढरीनाथ यांच्या लहान तीनही मुलांच्या शिक्षणासाठी बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे .

माळवाडी ग्रामस्थांची व परिसरातील नागरिकांची ही मदत समाजासाठी प्रेरणादायी असुन दुःखाचे संकट आलेल्या कुटुंबीयांना आधार देण्याचे कार्य माळवाडी ग्रामस्थांकडुन झाल्याने समाजामध्ये आजही माणुसकी जिंवत असल्याचा प्रत्यय अाज अनुभवयास मिळाला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या