मुलांच्या "मनातल्या कविता" पुस्तकात...

जातेगाव बु.,   ता.९ जुन २०१६ (प्रतिनीधी) : वढू खुर्द येथील दुसरी ते सातवीच्या  विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित कविता केल्या असून त्यांचा काव्यसंग्रह "मनातल्या कविता " या नावाने जेष्ठ  साहित्यिक रामचंद्र  देखणे यांच्या हस्ते  नुकताच  प्रकाशित झाला अाहे.

सचिन बेंडभर यांनी संपादित केलेल्या या  पुस्तकात एकूण ७५ कवितांचा समावेश  करण्यात आला असुन कवी भरत दौंडकर यांची या  पुस्तकाला प्रस्तावना अाहे.यशोदिप पब्लिकेशनच्या प्रकाशिका रूपाली अवचरे व निखिल लंभाते यांनी परिश्रमपूर्वक पुस्तकाची बांधणी केली  तसेच मुखपृष्ठकार श्रीकृष्ण ढोरे यांनी पुस्तकाला साजेसे मुखपृष्ठ दिले अाहे.

विद्यार्थ्यांच्या कवितांना ज्ञानपरिस,सुयश,काव्यप्रतिभा अशा पुस्तकांमधून पूर्णप्रसिद्धी मिळाली आहे.एवढेच नव्हे तर मुलांनी तालुका  स्तरावर काव्यसंमेलनात या  कवितांचे वाचनही केले आहे.बालशिक्षक साहित्य संमेलनात इयत्ता सहावी मधील वैष्णवी करचे हिने प्रथम क्रमांक  तर पाचवीतील ज्ञानेश्वरी भंडारे हिने दुसरा  क्रमांक पटकाविला.यातील पाचवीच्या वर्षा माकुडे या बालकवयिञीला रोटरी क्लब ऑफ  शिक्रापूरचा " प्रेरणा  पुरस्कार" मिळाला आहे.सुयोग वाचनालयाने वढू खुर्द  येथील  ग्रंथालय दत्तक घेतले  असून काव्यवाचन, पुस्तक भेट, ग्रंथदिंडी, ग्रंथ  प्रदर्शन, लेखक  आपल्या भेटीला  अशा  प्रकारचे  उपक्रम येथे राबवले जातात.

गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी येथील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या