इंग्रज काळातील पोलीस संख्येइतकं तरी मनुष्यबळ हवं

शिरूर,  ता.११जुन २०१६ (सतीश केदारी) : इंग्रजांच्या काळातील संख्येइतकं देखील मनुष्यबळ शिरुर पोलीस स्टेशन ला  सध्या उपलब्ध नाही.तर नुकत्याच मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यानंतर अाहे त्या रिक्त संख्ये इतकं तरी मनुष्यबळ उपलब्ध होइल का हा सवाल निर्माण झाला अाहे.

शिरुर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत नुकत्याच मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात अाले.यात सेवानिवृत्त व बदली झालेले असे मिळुन सुमारे १९ पोलीस कर्मचा-यांच्या जागा रिक्त झाल्या.तर रिक्त झालेल्या जागांवर तत्काळ ७ पोलीस कर्मचारी देखील नियुक्त करण्यात अाले.परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता इंग्रज काळातील संख्येइतकं देखील मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध नाही.दिवसेंदिवस वाढलेला कामाचा ताण अन वाढत असलेल्या तक्रारींचे निराकरण करायचे तरी कसे हा प्रश्न भेडसावतो अाहे.या पोलीस स्टेशन ला साधारण दिडशे ते दोनशे कर्मचा-यांची अावश्यकता असताना ५०-६० कर्मचा-यांवर या पोलीस स्टेशन सह अंतर्गत अौट पोस्ट,चौक्या चालवायच्या कशा हा मोठा प्रश्न निर्माण झाला अाहे.

बीट मार्शल चे काय ?

महिलांच्या सुरक्षेसाठी महिला बीट मार्शल ची जिल्हाभर नियुक्त्या केल्या परंतु या पोलीस स्टेशन ला महिला बीट मार्शल अद्याप उपलब्ध झालेली नाही. तर महिला कर्मचारी देखील  बोटावर मोजता  येइल इतकेच अाहेत .त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचे काय ? हा सवाल सर्वसामान्यांडुन केला जातोय.

या संदर्भात शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांना विचारले असता  बदल्या झालेल्या जागांवर काहि कर्मचारी रुजु झाले अाहेत.तसेच येत्या पांच दिवसांत काही पोलीस कर्मचारी रुजु होतील.परंतु जर उपलब्ध संख्येइतकं देखील मनुष्यबळ उपलब्ध नाही झाले तर अत्यंत बिकट परिस्थितीत पोलीस स्टेशन चालवावे लागणार अाहे.त्या मुळे कर्मचा-यांवर मोठा ताण येउ शकतो.

पिडितेची कुचंबना होतेय?

पोलीस स्टेशन बाबत अधिक माहिती जाणुन घेतली असता जागेअभावी देखील कसेबसे कामकाज करावे लागते अाहे.या संदर्भात सहायक पोलीस निरिक्षक उत्तम भजनावळे यांनी  अधिक माहिती देताना सांगितले कि  या ठिकाणी अत्याचारीत पिडिता अाल्यास स्वतंञ खोली नसल्याने ब-याचवेळा मोकळेपणाने त्या पिडितेला बोलता येत नाही.त्या मुळे या ठिकाणी स्वतंञ खोली उपलब्ध झाल्यास निश्चित त्या पिडितेला मनमोकळेपणाने व्यक्त होता येइल.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या