अहो ऐकलतं का?मुलगी झाल्यास प्रसुती खर्च माफ होणार

शिरूर,  ता.११जुन २०१६ (सतीश केदारी) :  स्ञी भ्रुणहत्या रोखण्यासाठी शिरुर येथील डॉक्टर दाम्पत्य अभिनव उपक्रम राबवत असुन या उपक्रमास  मान्यवरांच्या हस्ते  प्रारंभ करण्यात येत    येणार अाहे.


या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉ.सतीश अांधळे यांनी सांगितले कि,वैद्यकिय व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासुन काम करत असताना असे प्रकर्षाने जाणवले कि समाजात मुलगी म्हटलं कि अनेकांना नकोचं असे वाटते.मुलगी म्हटलं कि खुप खर्च करावा लागतो हिच खुळी समजुत असुन दुसरी बाजु विचारात घेतली असता गरीबी च्या कारणाने व अन्य कारणाने देखील स्ञी गर्भाची गर्भातच हत्या केली जात अाहे.समाजात या चुकिच्या गैरसमजापोटी कित्येक निष्पाप जिवांना मुकावे लागत अाहे.याच साठी अाम्ही पती-पत्नींनी हा विधायक उपक्रम राबविणार असल्याचे ठरविले अाहे.

या दवाखान्यात प्रसुती साठी दाखल झालेल्या गर्भवती मातांचे नॉर्मल अथव सिझर प्रसुती जरी झाली तरी कोणतेही बिल अाकारले जाणार नाही.तर यांवर होणारा सगळ्या खर्चाचा भार रुग्णालय उचलणार अाहे.त्याचप्रमाणे याच रुग्णालयात जन्मलेली मुलगी एक वर्षाची होइपर्यंत तपासणी देखील घेतली जाणार नाही.त्यामुळे पालकांना देखील मुलगी ही डोक्याला ओझे वाटणार नाही.

 डॉ. सतीश अांधळे हे बालरोगतज्ज्ञ असुन त्यांची पत्नी डॉ. अर्चना अांधळे या देखील स्ञीरोगतज्ज्ञ व प्रसुतीरोगतज्ज्ञ असलेले उच्चशिक्षित दाम्पत्य अाहे.
वैद्यकिय क्षेञात शिरुर तालुक्यात प्रथमच हा उपक्रम राबविला जात असल्याने अनेकांकडुन या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या