बियाणे वाटपात वाघाळेत गोंधळ

वाघाळे,  ता.१३ जुन २०१६ (प्रतिनीधी) :  येथे बियाणांचे वाटप करताना गोंधळ होत  असल्याची तक्रार येथील शेतक-यांनी केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि, नुकताचपुर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची पाळी पेरण्यांसाठी सगळीकडे लगबग सुरु झाली अाहे.दरम्यान च्या काळात कृषी विभागाकडून शेतक-यांना  मोफत बियाणांचे वाटप होत असते. त्याचा गरीब व अल्पभुधारक शेतकऱ्यांना या बियाणांचा फायदा होत असतो.वाघाळे येथे कृषी विभागाकडून बियाणांचे वाटप करण्यात आले.हे वाटप ग्रामपंचायत मार्फत गरीब व अल्पभुधारक शेतकऱ्यांना होणे गरजेचे असताना कृषी सहायकाने मनमानी पद्धतीने त्याचे वाटप केल्याची तक्रार दिलीप थोरात,नारायण महादू थोरात,प्रभू गोरडे, बाळासाहेब रामभाऊ थोरात,भाऊसाहेब खंडेराव पवार यांनी केली आहे.

या संदर्भात  कृषी सहायक चंद्रभान मंडलीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि,कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने या बियाणांचे वाटप करण्यात आले असुन बाजरी चे ३६  किलो २० लाभार्थ्यांना तर ११२ किलो मूग हे ४० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले अाहे.कृषी विभागाने जेवढा पुरवठा केला होता.तेवढेच बियाणे वाटप केले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या