करडे दरोडाप्रकरणातील दोन अारोपींना अखेर अटक

शिरूर,  ता.१५ जुन २०१६ (सतीश केदारी) :  डिसेंबर महिन्यात करडे येथे पडलेल्या दरोड्यातील पाच अारोपींपैकी  दोन अारोपींना पकडण्यात शिरुर पोलीसांना यश अाले अाहेत. इतर  तीन अारोपी अद्याप फरार अाहेत.दरम्यान चोरी केलेले सोने पोलीसांनी हस्तगत केले अाहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर २०१५ रोजी कर्डे येथील दावणमलिक येथे घातक शस्ञांच्या सहाय्याने पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता.या दरोडयात चोरट्यांनी मच्छिंद्र  बादल,पत्नी शारदा बांदल,मुलगा  नवनाथ बांदल यांना जबर मारहाण करत अंगावरील व कपाटातील सोने-चांदीचे दागिने लुटुन नेले होते. दरम्यान चोरट्यांच्या मारहाणीत  मच्छिंद्र बांदल यांना जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यु झाला अाहे.

अत्यंत गुंतागुंत असलेल्या व गंभीर प्रकरणाचा  तपास स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा व शिरुर पोलीस हे पोलीस अधिक्षक जय जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र  मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव,सहाय्यक पोलीस निरिक्षक रामाघरे,दत्ताञय गिरमकर,मुन्ना मुत्तनवार,गुरुनाथ गायकवाड,सुभाष राउत,महेश गायकवाड,यांच्या पथकाने कसोशीने तपास लावत दोन अारोपींना अटक करण्यात यश मिळवले अाहे. या गुन्हयात अारोपींनी चोरलेले सुमारे १ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोने चांदिचे दागिने पोलींसानी हस्तगत केले अाहेत.

या गुन्हयातील फरार तीन अारोपींना पकडण्यासाठी पथके तैनात केली असुन अटक केलेल्या एका  अारोपीवर लोणी काळभोर,शिरुर,यवत अादी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल अाहेत.

या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्धन शेळके,वैभव मोरे,नितीन गायकवाड,रविंद्र पाटमास,चंद्रकांत जाधव हे करीत अाहेत.Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या