शिरूर, ता.१६ जुन २०१६ (मुकुंद ढोबळे) : येथील तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाच्या स्टोर रूममधे घानीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले असून हे स्टोर रूम आहे की कबाड़खाना हेच कळने मुश्किल झाले आहे .
शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून सर्व शासकीय खाती एका छताखाली यावी यांसाठी नवीन प्राशकिय इमारत बांधली असून,या इमारती मधे शिरूर तालुका कृषी विभागालाही एक कार्यालय स्टोर रूम साठी जागा दिली अाहे.अद्यावत बांधलेल्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तालुका क्रुशि खात्याने आपले स्टोर रूम बनवले आहे.मात्र या तालुका कृषी खात्याने या स्टोर रूमचा कबाडखाना बनवुन टाकला अाहे.
या स्टोर रूम मधे जर काचेच्या खिडकीतून अात डोकावले असता याठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिक खुर्च्या,कागद पत्रे,रद्दी हि टेबलावर कच-यासारखी पडलेली असून-जुनी कपाटें तेथे अस्तव्यस्त पडलेली दिसत आहेत.या स्टोर रूम मधे भरमसाठ धूळ पडलेली असून,हे नक्की कोणाचे स्टोर रूम आहे याची विचारणा केल्यावर हे तालुका कृषी विभागाचे स्टोर रूम असल्याचे समजते. त्यात तालुका कृषी अधिकारी यांची खिडकीच्या आडगळीत पडलेली पाटी दिसल्याणे हि नक्कीच कृषी विभागाचीच स्टोर रूम असल्याचे खात्री होते.
एकीकडे शासन शासकीय कार्यालय अद्यावत व्हावी,त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे.परंतु ही अद्यावत कार्यालये शासकीय खात्यांचे ताब्यात दिली परंतु शिरूर तालुका कृषि खात्याने त्यांची योग्य प्रकारची देखभालच ठेवली नसल्याचे दिसून आले असून हे स्टोर रूम आहे की कबाड़खाना आहे हेच कळत नाही. एकिकडे तालुक्यातील महत्वांच्या कार्यालयांना जागा मिळत नसल्याचे वास्तव अाहे तर एकिकडे जागा उपलब्ध असताना केवळ कार्यालयांची देखभालच होत नसल्याची गंभीर बाब समोर अाली अाहे.
यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी यांची आपले कार्यालय किंवा स्टोर रूम अद्ययावत असावे यासाठी मानसिकता बदलने गरजेचे आहे.