...अन शिरुरकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

शिरूर,  ता.२१ जुन २०१६ (मुकुंद ढोबळे) :  एस टी स्टॅण्ड मधे बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरते.माञ हे मॉंकड्रील असल्याचे समजल्यानंतर उपस्थित   नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

शिरुर एस टी स्टॅण्ड मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळते.काहीवेळातच  पोलीस व्हॅन पोलीस ताफ्यासह घटणास्थळावर हजर होतात.एका ठिकाणी असलेल्या बॅग मधे बॉम्ब सदृश्य वस्तु असल्याचे त्यांनी सांगितले.लगेचच शिरूर पोलीस निरीक्षक यानी बॉम्ब शोधक पथकाला याची माहिती दिली.

तोपर्यंत जिल्हा पोलिसांनी जवळच्या पोलीसांना ही ख़बर दिली आणि शिक्रापुर,रांजणगाव पोलीस शिरूर एस टी स्टॅण्ड मध्ये दाखल होतात.काहि वेळातच पुणे बॉम्ब शोधक पथकाची मिनी बस सायरन वाजवत घटणास्थळावर दाखल होते. काही वेळात या पथकातील अधिका-यांनी परिसर सिल केला.तेवढ्यात सोबत आणलेल्या श्वान पथकातील राधा डॉग ने बॅग चेक केली.आणि ती मधोमध आणण्यात आली.काहीवेळा बॉम्ब शोधक च्या यंत्र सामग्री लावण्यात आली.बॉम्ब शोधक पथकाचे कर्मचारी बॅग जवळ जातात आणि अत्यंत हुशारीने बॅग जवळ झोपुन एकएक वस्तु बाजूला काढून बॅग उघडतात.या वेळी उपस्थित नागरिकांच्या ह्रुदयाचा ठोका देखील चुकत होता.काहि वेळात बॅग उघडून त्यातून वायर व एक रिकामा डबा बाहेर काढताच नागरिकांनी टाळ्यावाजवुन याला दाद दिली व दीड तासापासून सुरू असलेला बॉम्ब च्या सूटकेतून श्वास मोकळा केला.
अशाप्रकारे सोमवारी दुपारी मॉकड्रील शिरुर एस टीस्टॅंड मध्ये  राबविण्यात अाले.

या मॉंकड्रील मधे पुणे बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए.ए.लोंढे,एएसआय ए.एम.सावडे,पोलीस नाईक पी.एल.वाघमारे,आर.बी.कोंडके,पो.कॉ.एस.जी.मुळे,के.एस.पाटोळे,आर.के.जगताप,आणि श्वान राधा, तसेच शिरूर चे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर,पोलीस अधिकारी वाघमोडे ,भक्त,भोसले व शिरूर,शिक्रापुर येथील पोलीस कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या