शिरुर तालुक्यात योगदिन उत्साहात साजरा

शिरूर,  ता.२१ जुन २०१६ (प्रतिनीधी) :  योगदिनामित्त शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी अाज योगशिबिराचे अायोजन करण्यात अाले होते.

मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्यालय येथे सकाळपासुन शिक्षकांच्या उपस्थितीत योगा करण्यात अाला.तळेगाव ढमढेरे येथील ढमढेरे विद्यालयात देखील उत्साहाचे वातावरण होते.पठारेवस्ती येथे विद्यार्थ्यांबरोबरच महिला व पालकांनी योगाचे धडे घेतले.यावेळी मेघा मेणसे व प्रदिप साठे या शिक्षकांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगासनाचे असलेले महत्त्व पटवुन दिले.शिरसगाव काटा  येथे जि.प.प्राथमिक शाळेत योगासने विद्यार्थ्यांनी केली.

शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील निर्वी,शिरसगाव काटा, पिंपळसुटी,मांडवगण फराटा, त्याच प्रमाणे हिवरे कुंभार,करडे,वाघाळे अादी  भागातील शाळांमध्ये योगदिनानिमित्त उत्साहात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली अाहे.

योगदिनासाठी शासकिय व निमशासकिय कर्मचा-यांना नुकतेच तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिक्रापुर येथे देण्यात अाले होते.त्यानुसार अाज सर्वञ योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात अाले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या