युवासेनेकडुन गोशाळेला चारा वाटप

टाकळी हाजी,  ता.२२ जुन २०१६ (सतीश भाकरे) :   येथील युवासेनेच्या पदाधिका-यांनी नुकताच दुष्काळी भागातील गोशाळेसाठी चारा रवाना केला अाहे.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत शिवसेनेचा वर्धापनदिन हा खर्चिक न करता  अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले होते.व त्या बचती च्या पैशातुन सर्व कार्यकर्त्यांनी अार्थिक मदत  करत एक टेंम्पो भरुन चारा रवाना केला अाहे.

या प्रसंगी युवासेनेचे तालुकाप्रमुख माउली घोडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे, बापु शिंदे, गणेश जामदार, उपजिल्हाप्रमुख अाशिष शितोळे, व युवासेनेचे शिरुर-अांबेगाव चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी माहिती देताना तालुका प्रमुख माउली घोडे यांनी सांगितले कि,दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवुन बॅनरबाजी टाळुन अाम्ही हा उपक्रम राबवत अाहे.सध्याच्या दुष्काळात अद्याप समाधानकारक पाउस न झाल्याने सर्वञ जनावरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असुन या साठी सर्वांनीच हातभार लावणे गरजेचे अाहे.असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या