वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड.संजय येवले

शिरूर ता.२३ जुन २०१६ (सतीश केदारी) : शिरुर तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड.संजय येवले तर उपाध्यक्षपदी अॅड.संदीप ठोंबरे यांची  नुकतीच बिनविरोध निवड करण्यात अाली अाहे.

घोडनदी बार असोशिएशन ची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली.राजेंद्र शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुक कार्यक्रमात वकिल संघटनेच्या सर्वच सदस्यांनी निवडणुक प्रक्रिया बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.या वेळी सर्वानुमते अध्यक्षपदासाठी संजय कचरदास येवले यांची तर उपाध्यक्षपदासाठी संदीप शहाजी ठोंबरे यांची निवड करण्यात अाली.

या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.सुभाष गायकवाड,अार.व्ही. जाधव,
अॅड. अमित विलास खेडकर, अॅड.विकास दत्तात्रय कुटे, शिरीष लोळगे, अॅड.वसंत कोरेकर, संजय  वाखारे,किरण अांबेकर,निलेश कर्डिले, पी.टी.शिंदे,दिघे अादींनी सहकार्य केले.

या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांनी सांगितले कि,बार असोशिेएशनच्या समस्या सोडवणार असुन दाव्यांची व्याप्ती लक्षात घेउन सिनिअर डिविजन कोर्ट अाणण्याकामी प्रयत्न केले जातील.त्याचप्रमाने महिला वकिल व इमारती चा प्रश्न सोडवण्यासाठी अागामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे या वेळी त्यांनी बोलताना सांगितले.

नवनिर्वाचित पदाधिका-यांचे घोडनदी न्यायालयाचे न्यायाधिश एस.डी.घनवट, सहन्यायाधिश श्रीमती एम.ए. अादुके, सहन्यायाधिश अार.एन.खान यांनी अभिनंदन केले अाहे.

नवीन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष     : अॅड.संजय येवले
उपाध्यक्ष    :अॅड.संदीप ठोंबरे
सचिव      :अॅड.संजय भुजबळ
खजिनदार   : अॅड.अतुल ताजणे
सदस्य     : अॅड.रुपेश कर्डीले, अॅड.प्रदिप शितोळे, अॅड.अविनाश काळकुटे, अॅड.अमृता खेडकर, अॅड.स्नेहा कांबळे


 

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या