गरीबांचे गॅस चे स्वप्न होणार अाता पुर्ण !

शिरूर,  ता.२५ जुन २०१६ (मुकुंद ढोबळे) : पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत शिरूर तालुक्यातील सुमारे १७६०० लाभार्थ्यांना मोफत घरगुती गॅस जोड देण्यात येणार असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली अाहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहि दिवसांपुर्वी  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशातील एक कोटी नागरिकांनी घरगुती गॅस सबसिडी घेणे बंद केले असुन देशातील गोरगरीब जनतेला घरगुती गॅस जोड देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान उज्वला योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे १६४०० महिलांची तर शिरूर शहरातील ३२०० महिलांची केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २०११ च्या जनगणनेप्रमाणे निवड करण्यात आली असुन या लाभार्थ्यांना स्वतःचे आधार कार्ड,बॅंक पास बुकची झेरॉक्स व एक फोटो जमा करून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागणार अाहे.संबंधित लाभार्थ्यांना घरगुती गॅस कनेक्शन,सिलेंडर सोबत रेग्युलेटर व पाईप मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाचर्णे यांनी दिली असुन ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब जनतेला या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात शिरूर येथील एच.पी.गॅसचे वितरक एस.डी.दुगड यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज घेऊन व कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज त्वरीत भरून दुगड यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या