कालिकामाता विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा

वाघाळे,  ता.२७ जुन २०१६ (संभाजी गोरडे) : येथील कालिकामाता विदयालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विदयार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
 
वाघाळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विदयालयात गेले पंधरा वर्षाहुन अधिक काळापासुन शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे.तर दोन वर्षापुर्वी ग्रामस्थांनी गावातील व परिसरातील मुलींची पुढील शिक्षणाची गैर सोय पाहुन गावातच उच्च माध्यमिक विदयालय व्हावे यासाठी पाठपुरावा करून ते सुरू केले या उच्च माध्यमिक विदयालयाचा ही शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती विदयालयाचे मुख्याध्यापक नामदेव आगरकर यांनी दिली.

या मध्ये इयत्ता दहावीमध्ये धनश्री सुनिल जाधव हिने ८१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक महेश शिवाजी गायकवाड ८०.२० टक्के, व तॄतीय क्रमांक राजेंद्र कार्तिक भोसले यांने संपादन केला.तर नव्यानेच सुरू केलेल्या इयत्ता बारावीच्या कॉमर्स शाखेचा ही शंभर टक्के निकाल लागला असुन या मध्ये शुभांगी बाळासाहेब शेळके हिने 77.69 गुण संपादन करून प्रथम क्रंमाक पटकावला.तर वर्षा अनिल पवार हिने 74.46 टक्के गुण संपादन करून दुसरा क्रमांक पटकावला तर वॄषभ सखाराम शेळके याने 70.92 टक्के गूण संपादन करून तिसरा क्रमांक पटकावला असल्याची ,माहिती नामदेव आगरकर यांनी दिली.

चालु शैक्षणिक वर्षात विदयालयाला पंचवीस वर्ष पुर्ण होत आहेत.या पंचवीस वर्षाच्या कालावधीत विदयालयाने व विदयालयातील शिक्षकांनी अनेक  विदयार्थ्यांच्या जीवनाला पैलु पाडण्याचे काम केले आहे.परिणामी या विदयालयाचे अनेक विदयार्थी आपल्या जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत.सर्व सामान्य शेतक-यापासुन ते उदयोजक, व्यावसायिक, आय.ए,एस अधिकारी, आय.पी.एस.अधिकारी घडवण्याचे काम या विदयालयाने केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या