पिंपरखेड ला १५ वर्षीय मुलीची अात्महत्या

पिंपरखेड ,  ता.२८ जुन २०१६ (प्रा.सुभाष शेटे) : पिंपरखेड येथील दाभाडे मळ्यातील एका १५ वर्षीय मुलीने विहिरीत अात्महत्या केल्याची घटना घडली अाहे.

या बाबत मुलीच्या वडिलांनी शिरूर पोलिसांत खबर दिल्यानंतर पोलीस दप्तरी सदर मुलीचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार  प्रकाश कोकरे यांनी दिली अाहे.
 सविस्तर माहिती अशी कि,पिंपरखेडच्या दाभाडे मळ्यात आपल्या कुटुंबीया समवेत राहणारे नामदेव विठोबा दरेकर यांची १५ वर्षीय मुलगी भाग्यश्री हि (ता.२७) च्या पहाटे ५ च्या सुमारास घरात न दिसल्याने सकाळीच त्यांनी जवळच्या नातेवाईकांना बरोबर घेत शोध घेत घेतला.दरम्यान जवळच असणा-या त्यांच्या विहिरीवर शोध घेतला असता विहिरीत मुलीच्या चपला त्यांना दिसल्या.त्यानंतर तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसण्यात आले.या वेळी भाग्यश्री विहिरीत तळात आढळून आली.यानंतर लोकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढली असता तीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.या घटने बाबत मुलीच्या वडिलांनी टाकळी हाजी पोलिसांना खबर दिल्यानंतर सहायक फौजदार के.डी थोरात व हवालदार कोकरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

या संदर्भात पोलीस दप्तरी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोकरे हे करीत आहेत. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या