वाढदिवसाचा खर्च टाळुन मतिमंद मुलांना खाउ वाटप

कोरेगाव भीमा,  ता.१ जुलै २०१६  (सतीश केदारी) : खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस मतिमंद मुलांच्या शाळेत साधेपणाने साजरा केल्याची माहिती डॉ.वर्षा शिवले यांनी दिली.

सध्याची दुष्काळी गंभीर स्थिती लक्षात घेत शिरुर तालुका  महिला राष्ट्रवादी च्या वतीने खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले होते.त्याचप्रमाणे बॅनर व इतर सर्व खर्च टाळण्याचे अावाहन शिरुर तालुका  महिला अाघाडी च्या वतीने करण्यात अाले होते. त्यानुसार गुरुवार(ता.३०) रोजी सकाळी वाढदिवसाचे औचित्य साधत वाडा गाव येथे मतिमंद मुलांच्या संस्थेला भेट देण्यात अाली. या वेळी डॉ.शिवले यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेत  महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना फळे व खाउ वाटप करण्यात अाले.

या वेळी संस्थेच्या पदाधिका-यांनी प्रारंभी स्वागत करुन विद्यार्थ्यांची माहिती दिली.व शेवटी संस्थेच्या प्रमुखांनी मान्यवरांचे अाभार मानले.

शिरुर शहर राष्ट्रवादी च्या वतीने अांबळे येथे माजी अामदार पवार यांच्या उपस्थितीत खा. सुळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक चे शहरप्रमुख रंजन झांबरे यांनी संकेतस्थळाशी बोलताना दिली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या