कोणाचीच गय केली जाणार नाही- गावडे

शिरूर,  ता.१ जुलै २०१६  (सतीश केदारी) : शिरुर शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गैरप्रकार व टपोरीगिरी करणा-या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही असे अाज नवनियुक्त पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी पञकारांशी बोलताना संगितले.

शिरुर पोलीस स्टेशन चे भगवान निंबाळकर यांची बदली झाल्यानंतर दयानंद गावडे यांनी अाज पोलीस स्टेशन चा अधिकृतपणे पदभार स्विकारला.या वेळी अायोजित केलेल्या पञकार परिषदेत ते बोलत होते.या वेळी सर्वप्रथम त्यांनी परिचय करुन दिला.त्याचप्रमाणे अाजपर्यंत केलेल्या कामाचा अाढावा सांगितला.

या वेळी बोलताना गावडे म्हणाले कि,जनतेत पोलीसांची असलेली प्रतिमा हि बदलायची असुन जनतेला पोलीस हे मिञ असल्याची जाणीव व्हावी या साठी सर्वप्रथम प्रयत्न केले जाणार अाहेत.या पुर्वी  पोलीस सेवेत काम करत असताना वेळोवेळी तत्काळ पोलीस सेवा(Fast Polising) चा वापर केलेला अाहे.त्याचप्रमाणे या हि ठिकाणी गुन्हेगारी चे स्वरुप लक्षात घेता प्रत्येक तक्रारी च्या मुळाशी जाउन त्या-त्या तक्रारींचे निराकरण केले जाणार अाहे.प्रत्येक तक्रारींची थेट दखल घेतली जाणार असुन परस्पर विरोधी दाखल होणा-या तक्रारी,अदखलपाञ गुन्हयांची संख्या कमी करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.

शिरुर शहरात  त्वरीत फिरते गस्ती पथक तयार केले असुन त्या साठी दोन दुचाकी वाहने उपलब्ध केल्याचे सांगुन साखळीचोरी,व तत्सम गुन्हे रोखण्यासाठी फिरते गस्ती पथक संपुर्ण दिवसभर शहरात गस्ती घालण्याचे काम करणार अाहे.शिरुर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील प्रत्येक गावात लवकरच गावभेट दौरा अायोजित करुन त्या त्या भागातील समस्या जानुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी दोन महिला कर्मचारी नेमणार असुन इयत्ता ८ वी च्या पुढील प्रत्येक मुला-मुलींसाठी शाळा कॉलेजात  जाउन स्वत: मार्गदर्शन करणार असुन वेळोवेळी पालक सभा घेउन पालकांचे विचार ऐकुण घेण्याबरोबर योग्य त्या सुचना करनार असल्याचे त्यांनी या वेळी नमुद केले.त्याच बरोबर या विभागात येणा-या प्रत्येक शाळा,हायस्कुल ची पोलीस स्टेशन ची भेट हा अभिनव प्रयोग राबविला जाणार असल्याचे त्यांनी पञकारांना सांगितले.त्याचबरोबर महिला वर्गाला सुरक्षितता देण्यास  विशेष प्राधान्य देणार असल्याचे हे या वेळी उपस्थितांना सांगितले.

या वेळी अवैध धंदे व वाहतुक प्रश्नांसंदर्भात पञकारांनी छेडले असता लवकरच ढाबे, हॉटेल, लॉज व तत्सम धंदे करणारांची तपासणी करणार असुन गैरप्रकार अाढळल्यास कठोर कारवाई करण्याचे अाश्वासन त्यांनी या वेळी दिले.

तर कठोर कारवाई करणार...

भाडेकरारावर राहणा-या भाडेकरुंची माहिती येत्या दोन दिवसांत घरमालकांनी द्यावी.तसे न केल्यास घरमालकांवर कठोर कारवाइ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे सिमकार्ड विकणा-यांनी देखील कागदपञांची पुर्तता केली असेल तरच सिम द्यावीत.या ची देखील पडताळणी केली जाइल असे ते म्हणाले.

दादा, भाईंना थारा  नाही
पोलीस स्टेशन च्या हद्दीत वेगवेगळे ग्रुप असल्याची माहिती प्राप्त झाली असुन अशा ग्रुप च्या  दादा, भाईंची कोणत्याही प्रकारे हयगय करणार नसल्याचे या वेळी त्यांनी अावर्जुन सांगितले.

कोणत्याही तक्रारींसाठी थेट संपर्क साधा

मुली,महिला व नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थी चा अाधार न घेता थेट भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.प्रत्येकाला त्वरीत मदत देण्यात येइल असे म्हणत त्यांनी या वेळी अाश्वस्त केले.
संपर्कासाठी भ्रमणध्वनी : ९४०४२१८५४३
व्हॉट्सअप क्रमांक     : ९४२३८८४७४५

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या