शिरूर नगर परिषदेच्या आरक्षणानुसार 5 जागा खुल्या

शिरूर, ता. 3 जून 2016- शिरूर नगर परिषदेच्या दहा प्रभागांचे आरक्षण शनिवारी (ता. 2) सोडतीद्वारे कायम करण्यात आले. शिरूर शहरात 21 जागांसाठी दहा प्रभाग कायम करण्यात आले. नवीन आरक्षणानुसार 21 पैकी पाच जागा खुल्या असून, सहा जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नगर परिषदेत किमान 11 महिला नगरसेविका असतील. नगराध्यक्षपदाचे जुने आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. नगराध्यक्ष निवड आता थेट लोकांमधून होणार असल्याने हे आरक्षण बदलण्याची शक्‍यता आहे.

नगर परिषद सभागृहात आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस तहसीलदार राजेंद्र पोळ व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवानी यादव, श्रेयस घावटे व ऋतिक दौंडकर, घावटे या शालेय विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या.

प्रभाग एक ते नऊमध्ये प्रत्येकी दोन जागा; तर प्रभाग दहामध्ये तीन जागा, अशी रचना आहे. प्रभाग एकमधील एक जागा खुली; तर एक अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालेली आहे. प्रभाग दोन व तीनमधील प्रत्येकी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व एक जागा खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग चारमधील एक जागा खुली असून, दुसरी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग पाचमधील एक जागा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी व दुसरी जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. प्रभाग सहामध्ये एक जागा खुली असून, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग सातमधील दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यापैकी एक महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग आठमधील एक जागा अनुसूचित जातीसाठी; तर दुसरी सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आहे. प्रभाग नऊमध्येही एक जागा खुली; तर दुसरी नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग दहामध्ये तीन जागा असून, एक अनुसूचित जमातीसाठी, एक नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी व एक खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाली आहे.

प्रभागांचे प्रारूप पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. 1 ः
कामाठी पुरा, कैकाडी आळी, काची आळी, रम्यनगरी, साळुंखे मळा, प्रोफेसर कॉलनी, ढोरआळीचा काही भाग, साईनगरचा काही भाग, बी. सी. हाउसिंग सोसायटीचा काही भाग, गुरुकुल सोसायटी.
प्रभाग क्र. 2 ः ढोर आळीचा काही भाग, होलार आळी, बुरूड आळी, कुरेशी मोहल्ला, हल्दी मोहल्ला, मदारी वस्ती, मुंबई बाजार, इस्लामपुरा.
प्रभाग क्र. 3 ः सोनार आळी, जुना अंडे बाजार, अष्टविनायक कॉलनी, भाजी बाजार, शनी मंदिर परिसर, फकीर मोहल्ला, हलवाई चौक, खांडरे आळी, सुभाष चौक.
प्रभाग क्र. 4 ः सरदार पेठ, लाटेआळी, आंबेडकरनगर, आदिनाथनगर, मारुती आळी, धाडिवाल मळा, अमरधाम, पंचायत समिती, जोशीवाडी, महादेवनगर, पाचर्णे मळा, ढोमे मळा, डाकबंगला, पांजरपोळ.
प्रभाग क्र. 5 ः सूरजनगर, बागवाननगर, पोलिस लाइन, तहसील कार्यालय परिसर, विठ्ठलनगर, एमएसईबी कॉलनी, स्टेट बॅंक कॉलनी, बायपास झोपडपट्टी, जाधव मळा, पी. डब्ल्यू. डी. वसाहत.
प्रभाग क्र. 6 ः गणेशनगर, रेव्हेन्यू कॉलनी, गुजर मळा, करंजुले वस्ती, गीतानगर, कुकडी कॉलनी.
प्रभाग क्र. 7 ः डंबेनाला, आडत बाजार, सरदार पेठची दक्षिण बाजू, मारुती आळीचा काही भाग, चर्चसमोरील भाग, आदिनाथनगरची दक्षिण बाजू, रामआळी, कापड बाजार, रेव्हेन्यू कॉलनी, शांतिनगर, एसटी बस डेपो.
प्रभाग क्र. 8 ः मार्केट यार्ड, सिद्धार्थनगर, इंदिरानगर, जिजामाता हाउसिंग सोसायटी, शिवाजी सोसायटी, सैनिक सोसायटी, यशवंत कॉलनी, छत्रपती कॉलनी, गोपाळ वस्ती, एमएसईबी सबस्टेशन.
प्रभाग क्र. 9 ः मंगलमूर्तीनगर, पवार मळा, गादिया मळा, सर्टिफाइड स्कूल, आनंद सोसायटी, नरवीर तानाजी सोसायटी, ख्रिश्‍चन दफनभूमी, कामाठीपुरा दक्षिण भाग, बी. सी. हाउसिंग सोसायटी दक्षिण भाग, साईनगरचा काही भाग, सय्यदबाबानगर, इसवे कॉलनी, पाबळ फाटा परिसर, बायपास.
प्रभाग क्र. 10 ः प्रीतम प्रकाशनगर, वाडा कॉलनी परिसर, पाषाण मळा, देवी मंदिर परिसर, पाण्याची टाकी झोपडपट्टी, भिल्ल वस्ती, पारधी वस्ती, शिक्षक कॉलनी परिसर, दिघे मळा, बोरा मळा, बाफना मळा, थिटे कॉलेज परिसर, बोरा कॉलेज परिसर, कचरा डेपो, दत्त मंदिर परिसर ते बायपास, नवीन मार्केट यार्ड परिसर, घावटे वस्ती, हुडको कॉलनी (संभाजीनगर).
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या