एकात्मिक पद्धतीने शेती केल्यास फायदेशीर-विकास देशमुख

कुरुळी,  ता.३ जुलै २०१६ (सतीश केदारी)  : शेतक-यांनी एकात्मिक पद्धतीने शेती केल्यास शेतीतील जोखीम कमी होउन शेती निश्चित फायद्याची ठरेल असे प्रतिपादन राज्याचे कृषी अायुक्त विकास देशमुख यांनी कुरुळी येथे शेतक-यांना मार्गदर्शन करताना केले.

कृषी जागृती सप्ताह निमित्त कुरुळी येथे शेतक-यांचा कृषी मेळावा अायोजित केला होता.या वेळी ते बोलत होते.या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर,अात्मा चे उपसंचालक कुंडलिक कारखिले, जिल्हा कृषि अधिकारी सुभाष काटकर, तालुका कृषि अधिकारी संजय पिंगट,सरपंच रायबा  बोरकर, उपसरपंच प्रतिभा बोरकर, मंडल कृषि अधिकारी साजना इंगळे, मनोहर सरोदे, कृषि सहाय्यक जयवंत भगत,संतोष जगताप तसेच विभागातील कृषि अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या वेळी शेतक-यांना मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले कि,शेतक-यांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बागायती क्षेञाचे प्रमाण पाहता कमी असुन पाण्याचा अमर्यादित वापर हे एकमेव कारण अाहे. पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर नापीक होत अाहेत.शेतक-यांनी पावसाचे कमी होत असलेले प्रमाण पाहता पाण्याची साठवणुक करण्याची अावश्यकता असुन काटकसरीचा वापर करुन नियंञित शेतीतंञाचा अवलंब करावा.त्याचप्रमाने बारमाहि पिकांसाठी ठिबक सिंचन चा वापर करुन हवामान अाधारीत व  बहुपिक पद्धत नजीकच्या काळात केली तरच शेती फायद्याची ठरु शकेल असे ते या वेळी म्हणाले.

उसपिका बाबत मार्गदर्शन करताना ते म्हनाले कि,बहुतेक शेतक-यांमध्ये उसपिकाबाबत अनेक गैरसमज असुन ते गैरसमज दुर होणे गरजेचे अाहे. उसपिकाला जास्त पाणी व खत न देता दोन्हीचा वापर संतुलित ठेवुन सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास पिकाची अधिकाधिक उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होइल.परिणामी शेती तोट्याची कधीच जाणवणार नाही.

या वेळी शेतक-यांशी थेट संवाद साधत देशमुख यांनी शेतक-यांनी अाता स्मार्ट शेती करण्यास प्राधान्य देण्याचे उपस्थित शेतक-यांना सांगितले.
या प्रसंगी  अायुक्तांसमोर ठिबक सिंचन अनुदान वितरित करावे अशी मागणी केली.तसेच कांदा चाळीसाठी अनुदानाची मागणी केली.

तसेच जिल्हा कृषी अधिक्षक सुभाष काटकर यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित  शेतक-यांना कृषि  विभागाच्या मागेल त्याला शेततळे, मृद अारोग्य पञिका, पंतप्रधान पिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, ठिबक सिंचन,जलयुक्त शिवार, कृषी यांञिकिकरण, अशा अनेक योजनांबाबत काटकर यांनी मार्गदर्शन केले.
सलग १६ वर्षे सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविणारे प्रगतशील शेतकरी कांतिलाल नलगे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व उपस्थित शेतक-यांना पटवुन दिले.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन जयवंत भगत यांनी केले तर अाभार तालुका कृषि अधिकारी संजय पिंगट यांनी मानले.तर संतोष जगताप व सहका-यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या