अन रसिकही गेले चिंब न्हाउन ...

आंधळगाव,  ता.३ जुलै २०१६( सतीश केदारी) : अधुन मधुन कोसळणा-या पावसाच्या सरी अन ज्येष्ठ अभिनेञींची रंगलेली गप्पांची मैफिल यात अाज उपस्थित रसिक  चिंब न्हाउन गेले होते.
निमित्त होते कलाकार तुमच्या भेटीला या उपक्रमाचे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कलाकार तुमच्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात म्हणुन ज्येष्ठ अभिनेञी लीला गांधी यांच्या मुलाखतीने करण्यात अाली.
या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख,शाहिर दादा पासलकर,नाटय परिषदेचे सचिव दिपक रेगे तसेच माजी अामदार सुर्यकांत(काका) पलांडे अादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अभिनेञी लीला गांधी यांनी अायुष्यात नृत्य ते अभिनयापर्यंत चा प्रवास उलगडला.या वेळी त्यांनी गोड-कटु अाठवणींना या वेळी उजाळा दिला.तर यातील बहुतांश घटना सांगताना उपस्थित रसिक देखील काहिकाळ हरवुन गेले होते.या अाघाडी च्या नायिका हुशार असल्यातरी सर्वञ बिभत्सपणा वाढत असल्याची खंत त्यांनी या वेळी बोलुन दाखविली.

जर कंडक्टर ने वाचवले नसते तर...
अायुष्यातील लावणी नृत्यांगणा प्रवास सांगताना एका  गावात घडलेली घटना रसिकांपुढे मांडली.एका गावात कार्यक्रमास गेले असताना स्टेज नव्हते. त्यावर उपाय म्हणुन मोकळे बॅरल चा स्टेज रस्सी-दाव्यांनी बांधला.व ज्यावेळी नृत्य करण्याची  वेळ अाली तेव्हा स्टेजवर कसेबसे नृ्त्य केले.परंतु त्या कार्यक्रमानंतर  अायोजकाने जाण्याची परवानगी माञ दिली नाही.अखेर नजर चुकवत एस.टी च्या कंडक्टर ला मोठी विणवनी केल्यानंतर कसेबसे घरापर्यंत पोहोचता अाल्याचा रोमांचकारी अनुभव सांगितला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या