मुखईतील बोगस डॉक्टर दांपत्यावर कारवाई

मुखई,  ता.४ जुलै २०१६ (प्रतिनीधी) :   येथील बोगस डॉक्टर दांपत्यावर नुकतीच शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केली अाहे.   

ज्ञानेश्वर डेरे व शैला डेरे अशी या बोगस डॉक्टर दांपत्याची नावे असुन मुखई येथे मागील 16 वर्षांपासून डेरे दांपत्य ओम क्लिनिक नावाने दवाखाना चालवत आहे. बीएएमएस ही पदवी नसतानाही हे डेरे दांपत्य पदवीचा वापर करत होते. या बोगस दांपत्याला ४ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून जादूटोणाविरोधी कायद्यानुसार या दांपत्यावर कारवाई करता येईल का, याबाबत अधिक तपास करीत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पाटील यांनी सांगितले.
 
गेल्या अनेक वर्षांपासुन रुग्नांवर उपचार करना-या या डॉक्टर दांपत्याविरोधात अनेक तक्रारी येत होत्या.रुग्णांना खांदा व मानेवर इंजेक्शन दिल्यानंतर त्याला मुंग्या येणे, नखे झडणे, चालता न येणे असा त्रास सुरु झाला होता. यामुळे त्याने अंनिसकडे पाठपुरावा केला. अंनिसने पोलिसात तक्रार केल्यावर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वैजनाथ काशिद व पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करत डेरे दांपत्याला अटक केली.
 
या वेळी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संवेदनाशील औषधांचा साठा सापडला. बुवाबाजीचे सल्लेही ते देत असत. अघोरी उपायांचेही साहित्य यावेळी मिळून आले. यामुळे जादुटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई या दांम्पत्यावर होऊ शकते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव पाटील हे करीत आहेत.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या