प्रशासनाला जाग येणार तरी कधी?

सादलगाव ,  ता.४ जुलै २०१६ (संपत कारकुड) : वाळु ठेक्याच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्ती असलेली नदीची वारंवार वाळुसाठी खोदाई केल्याने नदीचे नदीपात्रात खोलवर जिवघेणे खडडे पडले असून संपुर्ण नदीचीच वाट लागल्यामुळे प्रशासन केव्हा जागे होणार? असा संतप्त सवाल जनतेकडुन होत आहे.

निसर्गाने मानवाला बहाल गेलेल्या पवित्र गंगेचे रुपांतर एखांद्या स्मशानभुमिमध्ये रुपांतरीत करण्याचे महान कार्य प्रशासनाने वारंवार वाळु ठेके देउन उरकलेले अाहे.आता नदीमधील खडडे बुजविण्याचा ठेका तरी द्या? असा खडा सवाल येथील सामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.

वाळुचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे नदीमधील भुखंड. मोठया प्रमाणात सिमेंटची जंगले तयार होत असताना नदीमधील वाळु किती पुरणार? परंतु उटसुट प्रत्येक वर्शी वाळु नसलीतरी या भुखंडाचे लिलाव काढले जात असून ठेके दिले जातात. भुखंडावर वाळु किती जमा आहे याचा कोणताही अंदाज न घेता फक्त नदी उकरण्याचा सपाटा चालू केला जातो. गौण खनीज व खाणीकर्म खात्याने पाणी कम वाळु ज्यादा असे धोरण ठेवून शासनाचा कोटयावधीचा महसुल बुडवून फक्त आपली दुकाने चालविली आहेत.

सामान्यजनांचे कितीही नुकसान झाले तरी चालेल परंतु वाळु ठेका दिला जातो, हा मोठा विरोधाभास आहे. आत्तापर्यंत वाळु भुखंडाचा चांगला अभ्यास असणारे महसुल अधिका-यांनी नदी आटल्यानंतर ठेक्यांमुळे नदीमध्ये किती खडडे पडले आहेत याची मोजदाद केली का? ती प्रथम करावी. हे खडे मोजुन त्याची खोली बघुन त्याच्या धोक्याचा अंदाजही घ्यावा. म्हणजे नदी किती लुटली आहे, हे लक्षात येईल.हे नदीचे विदारक चित्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच लक्षात येते.

नदीकाठावरील प्रत्येक गावांतील नागरिकांना हे खडडे सध्या मृत्युंचे सापळे ठरत असून वाळुच्या ठेकेदारांकडुन केवळ वाळुच्या लालसेपोटी वाटटेल तितके खोलवर खोदुन खडडे तयार झाले आहे.या अचानक पडलेल्या खडडयांचा येथील नागरिकांना कोणताही अंदाज येत नसल्यामुळे नदीमध्ये उतरलेल्या नागरिकांना जिव गमविण्याचे अनेक प्रसंग आलेले आहेत.

गेल्यावर्षी  सादलगाव येथे दोन शाळकरी लहान मुलांचा नाहक बळी खडयांमुळे गेला आहे. आत्तापर्यंत वाळुच्या खडडयांमुळे होणा-या जिवितहानीबाबत प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. उलट प्रत्येक वर्षी वाळुच्या ठेक्याच्या नावाखाली नदीची चाळण करण्याचे काम  होताना दिसत आहे. चालु वर्षीच्या दुष्काळाला सामोरे जाताना नदीमध्ये वाळुच राहिली नसल्यामुळे पाणी टिकून ठेवण्याची नदीची क्षमताही संपुष्टात आली असून यामुळे विहिर व विंधनविहिर इत्यादींना पाणीच राहिले नाही. निसर्गाची अनमोल स्थिती बिघडत असतांना प्रशासन यावर फक्त बघ्याची भुमिका घेत असून हे कुठेतरी थांबविण्याची गरज आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या