अण्णापुर ला तरुणाचा धारदार शस्ञाने वार करुन खुन

आण्णापूर,  ता.५ जुलै २०१६ (मुकुंद ढोबळे) : अण्णापुर -कर्डिलेवाडी रस्त्यावर अणापुर हद्दीत कॅनोल रस्त्यावर तरुणांचा डोक्यात धारदार शस्राने वार करून निर्घून खून केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणात सुनिल छबु पवार (वय ३५,रा.अण्णापूर)असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे.तर मारुती कुरुंदळे (रा.अण्णापुर ता .शिरूर) असे संशयित आरोपी चे नाव आहे.तर हा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची शक्यता फिर्यादीत मयताचा भाऊ सतीश छबु पवार याने दिली आहे.ही घटना ३ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याचा पूर्वी घडली आहे .

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुनिल पवार याचे प्रेम संबंध मारुती कुरुंदळे (रा.आण्णापुर)यांच्या बहीनीशी असल्याचे कारणांवरुन व त्या गोष्टीचा राग मनात धरून मारुती करूंदळे याने अगर त्याचे सांगण्यावरुन दूसरे कोणीतरी सुनिल पवार हा रविवारी ता.३ रोजी रात्री कर्डिलवाडी- अण्णापुर रस्त्याने मोटर सायकल प्लटीना क्रमांक MH -12-इ एच-  5596 हिने  येत असताना त्याच्य़ा  डोक्यात धारदार शस्राने वार करून त्याला जखमी करून त्याचा खून केला आहे.अशी फिर्याद मयत सुनिल पवार यांचा भाऊ सतीश पवार याने दिली असून,घटना स्थळास पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले,पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे यानी भेट दिली असून, गुन्हेगार यांच्या शोधा साठी शिरूर पोलीस,पुणे ग्रामीण चे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तीन ठिकाणी रवाना झाली आहेत.

या प्रकरणी पुढील तपास शिरूरचे पोलीस निरिक्षक दयानंद गावडे करीत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या