पोलीसांची प्रतिमा बदलायची अाहे-दयानंद गावडे

मांडवगण फराटा ,  ता.६ जुलै २०१६  (राजेंद्र  बहिरट) : जनतेत पोलीसांची असलेली प्रतिमा ही बदलायची असून जनतेला पोलीस हे आपले मित्र असल्याची जाणीव व्हावी यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी बोलताना सांगितले.

मांडवगण फराटा ग्रामस्थांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात अाला.या वेळी घोडगंगेचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, संचालक दादा पाटील फराटे, लतीकातार्इ जगताप, सरपंच सुवर्णा फराटे, उपसरपंच अशोक फराटे, पोलीस पाटील बाबापाटील फराटे, तंटामूक्तीचे अध्यक्ष नवनाथ शितोळे बाळासाहेब फराटे गणपतराव फराटे, आत्माराम फराटे, प्रभाकर घाडगे, माणिकराव फराटे, राजूपाटील फराटे, अशोक जगताप, शरद चकोर, पोलीस हवालदार आबासो जगदाळे, पोलीस नार्इक संतोष कदम, पोलीस काँस्टेबल हराळ, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गावडे म्हणाले कि,  महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी दोन महिला कर्मचारी नेमणार असून इयत्ता 8 वी च्या पुढील प्रत्येक मुला मुलींसाठी शाळा कॉलेजमध्ये जाऊन स्वत: मार्गदर्शन करणार म्हणाले.आताच्या नवीन पिढीच्या अंगात सैराट घुसले आहे.तरी त्या विदयार्थ्यांनी आर्इवडीलांच्या आदर्शप्रमाणे वागावे व मनामध्ये जिदद् आणि चिकाटी ठेऊन आपले शैक्षणिक ध्येय गाठावे. तसेच परीसरामध्ये होत असलेल्या अवैध धंदयाबाबत लवकरच कठोर पावले उचलणार असून त्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न केला जार्इल असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय फराटे यांनी केले तर आभार शंकरराव फराटे यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या