'सरांच्या' अात्महत्येप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

शिरूर ,  ता.९ जुलै २०१६ (प्रतिनीधी) :  येथील विदयाधाम चे शिक्षक विलास करंजुले अात्महत्येप्रकरणी शिरुर न्यायालयाने मुख्याध्यापकासह इतर तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अाहे.

या संदर्भात सविस्तर माहीती अशी की, विलास मेसू करंजुले हे शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथे शिक्षक म्हणुन कार्यरत होते. संस्थाचालकांच्या छळास कंटाळुन त्यांनी पाडळी रांजणगाव (ता.पारनेर) येथे २३ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन अापली जिवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मंगल करंजूले यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात अाला होता. त्यानंतर हा गुन्हा शिरुर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात अाला होता.दरम्यान  अात्महत्या प्रकरणातील अारोपी शिरुर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव, तुळशीराम परदेशी, सदस्य चंद्रकांत बाफना, मुख्याध्यापक सुभाष वेताळ, सहशिक्षक पांडुरंग वेताळ यांच्यासहित तीन अनोळखी  व्यक्ती अशा एकूण अाठ जणांच्याविेरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला होता.गेल्या अनेक महिन्यांपासुन या प्रकरणातील सर्वांनी अटकपुर्व साठी अतोनात प्रयत्न केले.

दरम्यान पोलीसांनी न्यायालयासमोर भक्कम बाजु मांडत या गुन्हयातील इतर अारोपींचा शोध घ्यायचा असल्याने जामीन देउ नये अशी न्यायालयाकडे मागणी केली होती.

न्यायालयाने पांडुरंग वेताळ वगळता इतरांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.अटक करण्यापुर्वी  या सर्वांना बाजु मांडण्याची संधी देण्यात अाली होती. सरकारी वकील अॅड.पवार व  फिर्यादी चे वकिल अॅड.निंबाळकर यांनी भक्कम बाजु मांडल्याने अारोपींचे मुद्दे फेटाळण्यात अाल्याने पुणे जिल्हा न्यायालयात पोलीसांनी याप्रकरणातील अारोपींना ताब्यात घेतले. शनिवारी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अारोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अाहे.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या